जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

पालिकेचे एवढे मोठे काम करूनही आढाव यांचा पुतळा नाही हे दुर्दैव – …या मंत्र्याचा खेद

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  स्वान्तंत्रसेनानी,प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष कै.माधवराव कचेश्वर आढाव यांनी तब्बल १४ वर्षे नगराध्यक्ष,४४ वर्ष नगरसेवकपद भूषवून जनसेवा केली.एवढे मोठे विकासकामे उभे केले असून हि त्यांचा पुतळा उभा राहू शकला नाही.याचा खेद व्यक्त करून तो पुतळा उभारला जावा अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुकत्याच जिल्हाधिकारी यांचेसह मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.त्याचे कोपरगाव शहरात स्वागत होत आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे.

स्व.माधवराव आढाव यांच्या पुतळ्याचे काम कोपरगावच्या नेत्यांनी याआधीच करायला हवे होते.ते जसे एकत्र येऊन सहकारी कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध करतात.शेतकऱ्यांच्या ऊसाचे दर एकत्र येऊन ठरवतात असे बोलताच व्यासपीठावर उपस्थित संजीवनी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी त्यांच्या भाषणाचे मध्येच खंडन करत,”पुढे जाऊन प्रवरा कारखाना व संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका अशाच होतात असे सांगा” असा टोला लगावला आहे.त्यावर उपस्थितांत मोठी खसखस पिकली होती.

   स्वातंत्र्य सेनानी कोपरगांव नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.माधवराव कचेश्वर आढाव यांच्या जयंती उत्सवानिमित्त माधव बाग येथे त्यांच्या पुतळ्याचे भुमीपूजन व लक्ष्मीनगर कमान उद्घाटन सोहळा काल शनिवार सायंकाळी ०५.३० वाजता
राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पाटबंधारे राज्यमंत्री आण्णासाहेब म्हस्के हे होते.

माजी राज्यमंत्री आण्णासाहेब म्हस्के.

  

दरम्यान कार्यक्रमास आपल्या मार्गदर्शकांना पाठवून विद्यमान आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी या कार्यक्रमास दांडी मारल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

  त्यावेळी वैजापूरचे आ.रमेश बोरनारे,माजी आ.अशोक काळे,संजीवनी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,गोदावरी परजणें दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,बी.एस.एन.एल.चे संचालक ॲड.रविंद्र बोरावके,सुशीला म्हस्के,पद्मकांत कुदळे,राजेंद्र जाधव आदि मान्यवरांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

माजी आ.अशोक काळे.

  

दरम्यान या कार्यक्रमास परवानगी नसल्याचा आरोप करून वर्तमान लोकप्रतिनिधीने नगरपरिषदेच्या एका वरिष्ठ अधीधिकाऱ्यांच्या आडून बाण मारून या कार्यक्रमास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असून त्याची बित्तंबात थेट पालकमंत्र्यापर्यंत पोहचली असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून व कोपरगाव नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्याचे चांगलेच कान उपटले असून थेट बडतर्फीची धमकी दिली असल्याचे विश्वसनीय माहिती हाती आली आहे.तेंव्हा कुठे हा कार्यक्रम सुरळीत पार पडला आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना मंत्री विखे म्हणाले की,”वास्तविक माजी नगराध्यक्ष माधवराव आढाव यांच्या प्रदीर्घ कार्याची दखल घेऊन कोपरगावातील वर्तमान नेत्यांनी (काळे,कोल्हे) दखल घेऊन पुतळा उभारण्याची गरज होती.मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नसल्याचा खेद व्यक्त करून त्याबाबत त्यांच्या नातेवाईकांना विशेषतः विजय आढाव यांनाच दखल घ्यावी लागली आहे.त्यांनी वारंवार आपल्याकडे पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले आहे.आता यात सामान्य नागरिकांनी आपला खारीचा वाटा उचलून योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

संजीवनी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे.

  

दरम्यान आगामी कोपरगाव नगरपरिषद निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली असताना हा कार्यक्रम पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी राज्यमंत्री आण्णासाहेब म्हस्के आणि आढाव यांच्या आडून पार पाडून घेतली असून आढाव या स्थानिक मराठा समाज एकत्र करण्याची संधी साधली असल्याचे बोलले जात आहे.यातून ते स्थानिक परजणे गट शक्तिशाली करण्याचे धोरण असून सगमनेर नंतर विखे गट कोपरगावात मोठ्या प्रमाणावर सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे स्थानिक काळे- कोल्हेनी यात अडथळा आणल्याचे मानले जात आहे.

  सदर प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले,”कुटुंबवत्सल म्हणून स्व.अप्पांनी सर्वांचे संगोपन केले.त्यागमूर्ती हे त्यांचे एक वैशिष्ट्य होते.कै.शंकरराव काळे व कै.शंकरराव कोल्हे यांच्यामध्ये समन्वय साधायचे काम स्व. अप्पांनी नेहमी केले.गोरगरीब,त्रस्त असलेल्या जनतेसाठी त्यांनी स्वतःची साडेतीन एकर जमीन दिली.स्व.अप्पांनी तन मन धनाने कोपरगावकरांची सेवा केली.कै लक्ष्मीबाई यांच्यामुळे स्व.अप्पा एवढे मोठे कार्य उभे करू शकले असल्याचे सांगून.कोपरगावच्या नेत्यांनी हे काम करायला हवे होते.ते जसे एकत्र येऊन सहकारी कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध करतात.शेतकऱ्यांच्या ऊसाचे दर एकत्र येऊन ठरवतात असे बोलताच व्यासपीठावर उपस्थित संजीवनी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी त्यांच्या भाषणाचे मध्येच खंडन करत,” पुढे जाऊन प्रवरा कारखाना व संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका अशाच होतात असे सांगा” असा टोला लगावला आहे.त्यावर त्यांनी मिश्किल हास्य करत आपल्या भाषणाला पुढे वेग देऊन त्यांना अनुल्लेखाने मारले असल्याचे दिसून आले आहे.

माजी नगराध्यक्ष स्व.माधवराव आढाव.

   सदर प्रसंगी बिपीन कोल्हे म्हणाले,मितभाषी असलेले स्व.अप्पा मितभाषी होते.सर्व सामान्यांचे नगरसेवक,नगराध्यक्ष होते.त्यांच्या पिशवीत शिक्के असायचे रस्त्यावरच ते नागरिकांच्या समस्या सोडवीत असत.लोकांवर त्यांचा विश्वास असल्याने एक अतूट नाते सर्व सामान्य नागरिक,पालिका कर्मचाऱ्यांशी त्यांचे होते. स्वातंत्र संग्रामात सहभाग घेवून त्यांनी कारावास भोगला.त्यानंतर त्यांनी कोपरगावकरांची सेवा करून वेगळे स्थान निर्माण केले.

   माजी आ.अशोक काळे म्हणाले,”कुटुंबियांची जबाबदारी सांभाळून शहरासाठी रात्रंदिवस झटणारे नेतृत्व म्हणजे कै.माधवराव आढाव होते.सर्व सामन्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वताला झोकून दिले.अनेक महापूर अनुभवलेल्या स्व.अप्पांनी गोरगरीबांची सेवा केली.कै.शंकरराव काळे व स्व.अप्पांची सामाजिक बांधिलकी होती.कुठलाही निर्णय घेताना स्व.अप्पांनी स्वहितापेक्षा लोकहित डोळ्यासमोर ठेवले.हा त्यांचा गुण आजच्या पिढीला प्रेरणा देत असल्याचे गुणगान गायले आहे.

   राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यावेळी म्हणाले,”स्व.माधवराव आढाव हे तब्बल ४४ वर्ष नगरसेवक व १४ वर्षे नगराध्यक्ष राहिले होते.त्यांचा हा राज्यात विक्रम असावा.स्व.अप्पांचा सर्वानाच आदरयुक्त दबदबा,दरारा अजून आठवतो,एवढे वर्षे सत्ता असूनही स्वतः किंवा कुटुंबासाठी त्यांनी काही करू शकले नाही.स्व.आढाव कुटुंबियाचे कोपरगावशी वेगळे नाते आहे.स्व. अप्पांचे ऋण व्यक्त करण्याचे भाग्य या निमित्ताने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कोयटे व भावना गवांदे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रसाद आढाव यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close