जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

सौर कृषी पंप असून अडचण नसून खोळंबा!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   शेतात सौर कृषी पंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे. शेतकर्‍यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसात तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले असताना संबंधित कंपन्या मात्र शेतकऱ्यांना ठेंगा दाखवत असून त्यामुळे शेतातील सौर कृषी पंप असून अडचण नसून खोळंबा ठरत आहेत.याबाबत महावितरण कंपन्यांनी या सौर कृषी पंप कंपन्यांना चाप लावावा अशी मागणी संवत्सर येथील शेतकरी अंबादास सोनवणे यांनी केली आहे.

संकल्पित छाया चित्र.

सौर कृषी पंप घेतना कंपन्यांचे प्रतिनिधी आधी गोडगोड बोलताना दिसतात.एकदा का सौर पंप बसला आणि त्याचे बिल त्यांच्या पदरात पडले की कंपन्यांचे अधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी फोन उचलत नाही.उचलले तर उत्तर नीट देत नाही.पाच वर्षाची गॅरंटी असताना ती एक वर्षाची असल्याची बतावणी सुरू होते.एक दुसऱ्याचे फोन देतात.पण दुसरा ते उचलत नाही परिणामी शेतकरी हताश होऊन जात आहे.



     राज्यात विविध योजनांमध्ये ०५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले असल्याची माहिती आहे.हे सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाईल अ‍ॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली असल्याचे ढोल बडवून सांगितले जात आहे.

महावितरणने लाभार्थी शेतकर्‍यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार करण्यासाठी यापूर्वी वेबसाईटवरून तक्रार करणे,संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करणे किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते.आता मोबाईल फोनवरील महावितरणच्या अ‍ॅपद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

संवत्सर येथील शेतकरी अंबादास सोनवणे यांचा सौर कृषी पंप दिसत आहे.

“आम्ही दोन शेतकऱ्यांनी ओसवाल कंपनीचा सौर कृषी पंप दि.२८ मे २०२५ रोजी बसवला असून तो विहिरीसाठी मागितला असताना कंपनीने तो जाणूनबुजून विंधन विहिरीचा पुरवला आहे.पंपाचा हेड जाणीवपूर्वक बदलून देऊन शेतकऱ्यांना या कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी अतिरिक्त पैसे काढण्यासाठी त्रास देत आहे.दोन महिन्यापासून सौर ऊर्जा पुरेशा प्रमाणात असताना हे पंप पुरेसे पाणी देत नाही.याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी ठाव लागू देत नाही.,पोर्टलवर तक्रार केली तर ती आधी नाशिकला वर्ग केली असल्याचे सांगितले नंतर ती नगरला गेली असल्याची बतावणी केली नगरवरुन कोपरगावात भेटलो तर महिला अधिकारी मदत करत नाही”-अंबादास सोनवणे,कार्यकर्ते,शेतकरी संघटना,कोपरगाव तालुका.



   महावितरणचे मोबाईल अ‍ॅप लोकप्रिय ठरले असल्याचा मोठा राणा भीमदेवी दावा केला जात आहे.वीज ग्राहक त्याचा वापर आपले वीज बिल जाणून घेणे,बिल भरणे यासह मीटर रिडिंग नोंदणी,वीज चोरी कळविणे,नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची माहिती कळविणे अशा विविध कामांसाठी करत असल्याचा कंपनीचा दावा आहे.त्याच प्रमाणे आता शेतकर्‍यांना या मोबाईल अ‍ॅपमध्ये ’सौर पंप तक्रार’ यावर क्लिक करून सौर कृषी पंपाविषयी तक्रार दाखल करता येईल असे सांगितले जाते.तक्रार नोंदविताना शेतकर्‍याने सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहिणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते.
सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे,सौर पॅनेलची नासधूस होणे,सौर ऊर्जा संच काम करत नसणे,किंवा कमी दाबाने चालणे,सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील.म्हणून सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला असल्याचा कंपन्यांचा दावा आहे.मात्र हे सर्व दावे फोल असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.आधी सौर कृषी पंप घेतना कंपन्यांचे प्रतिनिधी गोडगोड बोलताना दिसतात.एकदा का सौर पंप बसला आणि त्याचे बिल त्यांच्या पदरात पडले, सरकारी अनुदान लाटले की कंपन्यांचे अधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी फोन उचलत नाही.उचलले तर उत्तर नीट देत नाही.पाच वर्षाची गॅरंटी असताना ती एक वर्षाची असल्याची बतावणी सुरू होते.एक दुसऱ्याचे फोन देतात.पण दुसरा ते उचलत नाही परिणामी शेतकरी हताश होऊन जात आहे.त्यामुळे या प्रकरणी लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत लक्षवेधी करणे गरजेचे बनले आहे.तर महावितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालणं गरजेचे बनले आहे.

  आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संवत्सर येथील शेतकरी अंबादास विठ्ठल सोनवणे म्हणाले की,”आपण व आपले सहकारी शेतकरी सदाशिव आबक आम्ही दोघांनी ओसवाल कंपनीचा सौर कृषी पंप दि.२८ मे २०२५ रोजी बसवला असून तो विहिरीसाठी मागितला असताना कंपनीने तो जाणूनबुजून विंधन विहिरीचा पुरवला आहे.पंपाचा हेड जाणीवपूर्वक बदलून देऊन शेतकऱ्यांना या कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी अतिरिक्त पैसे काढण्यासाठी त्रास देत आहे.दोन महिन्यापासून सौर ऊर्जा पुरेशा प्रमाणात असताना हे पंप पुरेसे पाणी देत नाही.याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी ठाव लागू देत नाही.येथील महिला अधिकारी फोन क्रमांक देत नाही.तक्रार ऐकून घेत नाही.ती निकाली काढत नाही,पोर्टलवर तक्रार केली तर ती आधी नाशिकला वर्ग केली असल्याचे सांगितले नंतर ती नगरला गेली असल्याची बतावणी केली नगरवरुन कोपरगावात भेटलो तर महिला अधिकारी नावही सांगत नाही आणि तक्रार निकाली काढत नाही असा आरोप करून यात लक्ष न घातल्यास संबंधित शेतकरी आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अंबादास सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.आता महावितरण कंपनी कोणती भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close