जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

… “त्या” वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

   कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात स्वस्तात बिनशेती प्लॉट देतो असे म्हणत तब्बल २९ जणांकडून ४६ लाख रुपये रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा दिला आणि प्लॉट नावावर न करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा आरोपी शिवमदास बाबत बोलताना व विविध स्थानिक वृत्त वाहिन्यांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी वकीलांबाबद वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा व स्थानिक वृत्त वाहिन्यांचा कोपरगाव वकील संघाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात निषेध व्यक्त केला आहे.

  

कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील प्लॉट खरेदी फसवणूक करणारा आरोपी जेरबंद केल्यावर त्यावेळी त्यांनी स्थानिक वृत्त वहिनी ‘एस.२४ तास’ युट्यूब चॅनलला प्रतिक्रिया देताना,”खरंतर आरोपी शिवमदास पेक्षा व सर्च रिपोर्ट काढणाऱ्या “…त्या” हरामखोर वकिलाला पोलिस प्रशासनाने अटक केली पाहिजे” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते असा कोपरगाव वकील संघाचा आरोप आहे.त्यातून हा वाद उद्भवला आहे.

  

  याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात स्वस्तात बिनशेती प्लॉट देतो असे म्हणत तब्बल २९ जणांकडून ४६ लाख रुपये रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा दिला आणि प्लॉट नावावर न करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा आरोपी शिवमदास याला शहर पोलिसांनी तब्बल वर्षभराने अटक केली होती तर यातील अन्य आरोपी फरार झाला असताना याबाबत प्लॉट धारकांनी शहर पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती.त्यावेळी प्लॉट धारकांच्या विनंतीला मान देऊन शिवसेनेचे पदाधिकारी भरत मोरे हे ही हजर होते.त्यावेळी त्यांनी स्थानिक वृत्त वहिनी ‘एस.२४ तास’ युट्यूब चॅनलला प्रतिक्रिया देताना,”खरंतर आरोपी शिवमदास पेक्षा व सर्च रिपोर्ट काढणाऱ्या “…त्या” हरामखोर वकिलाला पोलिस प्रशासनाने अटक केली पाहिजे” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते असा कोपरगाव वकील संघाचा आरोप आहे.त्यामुळे त्यांनी या वक्तव्याचा व  प्रसारित केलेल्या वृताचा एक प्रसिध्दी पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे.या शब्दाने राज्यातील सर्व वकिलांच्या भावना दुखावल्या आहेत.याबाबत वकील संघ कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अशोकराव वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

याबाबत निवेदनाच्या प्रती त्यांनीं महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष,कोपरगाव तहसीलदार महेश सावंत,पोलिस निरीक्षक भगवान मथुरे आदीसह एस.२४ तास संपादक यांना निवेदन पाठवली असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close