आंदोलन
…या तालुक्यात रस्त्याची दुर्दशा,प्रवाशांत संताप !

न्युजसेवा
धामोरी-(दत्तात्रय घुले)
कोपरगाव तालुक्याच्या वायव्येस साधारण बावीस कि.मी.अंतरावर असलेल्या व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजला जाणारा रस्ता धामोरी-कोपरगाव या राज्य मार्गावर अतिशय मोठ्या प्रमाणावर खड्यांचे साम्राज्य दिसुन येत आहे.त्यामुळे प्रवाशी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील रस्ते हा चेष्टेचा विषय ठरला आहे.’रस्त्यांच्या निधीची उड्डाणे कोट्यवधीची मात्र रस्त्यावर खड्डे लाखोंची’ अशी कोपरगाव तालुक्यातील विदारक स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक प्रवाशी आपल्या जिवानिशी जात आहे.रस्ते जरी झाले तरी त्याची कोणतीही हमी बांधकाम विभाग आणि ठेकेदार देत नाही.
उत्तर नगर जिल्ह्यातील रस्ते हा मोठा चिंतेचा विषय ठरलेला आहे.त्यातले त्यात कोपरगाव तालुक्यातील रस्ते हा चेष्टेचा विषय ठरला आहे.’रस्त्यांच्या निधीची उड्डाणे कोट्यवधीची मात्र रस्त्यावर खड्डे लाखोंची’ अशी कोपरगाव तालुक्यातील विदारक स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक प्रवाशी आपल्या जिवानिशी जात आहे.रस्ते जरी झाले तरी त्याची कोणतीही हमी बांधकाम विभाग आणि ठेकेदार देत नाही.परिणामी पुढे रस्त्याचे काम सुरू असताना मागे तो लगेच आपले मूळ खड्ड्यांचे स्वरूप दाखवताना दिसत आहे.त्यामुळे रस्ते हे केवळ नेते,अधिकारी आणि ठेकेदार आदींना केवळ कमिशन खाण्यासाठी असल्याचा समज तालुक्यात पसरला असल्यास नवल नाही.
दरम्यान अशीच अवस्था कोपरगाव ते धामोरी या रस्त्याची बनली आहे.हा रस्ता धामोरी येथील तसेच मायगाव देवी,चास नळी,मोर्वीस,मंजुर सांगवी भुसार येथील शेतकरी वाहतुकीसाठी महत्वपूर्ण समजला जातो.परंतु या रत्यालगत महिन्यांपासून खडी आणुन ठेवली आहे.तरी रत्यांच्या कामाला अजुन सुरवात झाली नाही.ही खडी रस्त्यावर विखूरल्याने वाहण चालकांमध्ये लहाण मोठे अपघातही होताना पहावयास मिळते.तरी संबंधित बांधकाम विभाग अधिकारी यांनी या रस्याच्या कामासाठी लक्ष देवुन लवकरात लवकर काम चालु करून रस्ता दुरूस्ती करावी.अशी मागणी परिसरातील नागरिक,शेतकरी,वाहनचालकांकडून होत आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आता कोणती कारवाई करणार याकडे प्रवाशांचे आणि ग्रामस्थांचे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.