जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

प्रेमभंगातून तरुणाची आत्महत्या ? कोपरगावात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील वारी नजिक असलेल्या साकरवाडी येथील सोमय्या केमिकल कारखान्यात कर्तव्यावर असलेला तरुण अभिषेक कैलास इथापे (वय -२६) या तरुणाने विषारी औषध प्राशन करून तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा नुकतीच संपवली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.याबाबत त्यास उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

  

दरम्यान याबाबत स्थानिक नागरिकांकडून मिळाल्या माहितीनुसार यातील मयत तरुण आणि एका तरुणीचे आंतरजातीय प्रेमसंबंध होते.त्यांनी दोन वर्षापूर्वी आपला आंतरजातीय नोंदणी (रजिस्टर) विवाह केला होता.मात्र या लग्नास मुलीच्या घरच्या नातेवाईकांचा विरोध होता अशी माहिती मिळत आहे त्यातून ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे समजते.

   भारतातील आत्महत्येचा दर अभूतपूर्व वेगाने वाढत आहे.डेटा गोळा केल्यापासून गेल्या सहा दशकांमध्ये असा दर यापूर्वी कधीही दिसून आला नव्हता.२०२२ मध्ये,राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने देशात १.७१ लाख आत्महत्यांची नोंद केली आहे आणि यापैकी ४०% मृत्यू मुले आणि तरुणांमध्ये होते.जर आपण बारकाईने पाहिले तर,२०२२ मध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सुमारे १० हजार तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.साधारणपणे,भारतात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आत्महत्यांमुळे मृत्यू जास्त होतात.तथापि,या वयोगटात, आपल्याला आकडेवारीत एक विसंगती दिसून येते,जिथे ५५% आत्महत्या मुली आणि तरुणींमध्ये झाल्याचे आढळते.त्याच वर्षी झालेल्या आत्महत्येच्या एकूण मृत्यूंपैकी ३०% मृत्यू १८ ते ३० वर्षे वयोगटातील लोकांचे होते.सातत्याने,या वयोगटातील महिलांपेक्षा जास्त पुरुष आत्महत्येने मरण पावले असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातून उघड झाली असून वारी नजिक असलेल्या साकरवाडी येथील सोमैया या खाजगी तत्वावरील कारखान्यात ही दुर्दैवी घटना दिनाक २३ मे च्या दुपारी २.३० च्या सुमारास घडली आहे.यातील मयत तरुण अभिषेक इथापे यांनी अज्ञात विषारी औषध प्राशन करून तिसऱ्या (की चौथ्या?) मजल्यावर जावून उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली आहे.ही घटना नजीकच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आली असता त्यानी त्यास उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात येथे भरती केले असता त्या ठिकाणी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मोनिका पोतदार यांनी त्यास मृत घोषित केलं आहे.त्याच्या पश्चात आई,वडील,एक लहान भाऊ असा परिवार आहे.

    दरम्यान याबाबत स्थानिक नागरिकांकडून मिळाल्या माहितीनुसार यातील मयत तरुण आणि एका तरुणीचे आंतरजातीय प्रेमसंबंध होते.त्यांनी दोन वर्षापूर्वी आपला आंतरजातीय नोंदणी (रजिस्टर) विवाह केला होता.मात्र या लग्नास मुलीच्या घरच्या नातेवाईकांचा विरोध होता अशी माहिती मिळत आहे.नंतर संबधित मुलीस नंतर मोठ्या पगाराची पाच आकडी नोकरी लागली होती.त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.त्यातून त्याने हे कृत्य केलं असल्याची नागरिकांत चर्चा आढळून आली आहे.त्यास पोलिस सूत्रांनी अधिकृत दुजोरा दिला नाही मात्र चर्चा नाकारली नाही.मृत्यूपूर्वी त्याने दोघांच्या विवाहाचे व्हीं.डी.ओ.छायाचित्र सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यानंतर आपली जीवनयात्रा संपवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यानंतर आपला मोबाईल अज्ञात ठिकाणी टाकून दिला असल्याचे समजते.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१४९,१५०/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे,ए.व्हीं.गवसणे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गवसणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close