निवडणूक
कोपरगाव तालुक्यात ३८ ठिकाणी महिला राज अवतरणार !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
अहिल्यानगर जिल्ह्यातील पुढील पाच वर्षासाठीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जाहीर केल्या प्रमाणे आज कोपरगाव तहसील कार्यालयास संपन्न झाला असून त्यात एकूण ७५ ग्रामपंचायती पैकी ३८ ग्रामपंचायतीत महिला राज अवतरणार असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे तालुक्यात,”कही खुशी कही गम’ अशी संमिश्र स्थिती ओढवली आहे.

या शिवाय नागरीकांचा मागास प्रवर्ग यासाठी २० जागा राखीव असून त्यात ५० टक्के महिला १० तर ५० टक्के पुरुष १० असे प्रमाण ठरवले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतीचे पुढील पाच वर्षांसाठी तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात करण्यात आले आहे.सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल तर उपविभागीय पातळीवर महिला सरपंच आरक्षण आज आणि उद्या निश्चित केले जाणार आहे.दरम्यान, जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज राहणार आहे.तर ९६ ग्रामपंचायतीमध्ये २०२१ ला आरक्षण काढण्यात आलेले होते.त्या ठिकाणी जुनेच आरक्षण कायम ठेवले होत.तर आज काढले जाणारे आरक्षण हे सन-२०२५-२०३० या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
यात जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल रोजी अंतिम केले आहे.तर २४ एप्रिल रोजी उपविभागीय कार्यालयात अकोले २४,जामखेड ३०,श्रीरामपूर २७,कोपरगाव ३८,शेवगाव ४८,श्रीगोंदा ४४,नगर ५४ ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण सोडत संपन्न झाली आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील ३८ ठिकाणी महिलाराज असणार असल्याचे उघड झाले असून त्यात पुढील गावे आणि महिला सरपंच आरक्षण दर्शवले आहे.
दरम्यान पुढे अनुसूचित जातीच्या १० गावांचे आरक्षण असून त्यात ०५ महिलांचे आरक्षण पाहिले दर्शवले आहे त्यात कोळगाव थडी,अंचलगाव,मुर्शतपुर,धोत्रे व घारी यांचा समावेश आहे.तर अन्य अनुसूचित जाती पुरुषांसाठी ०५ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे त्यात कोळपेवाडी,आपेगाव, पढेगाव,तळेगाव मळे,सोनेवाडी आदींचा समावेश आहे.
तर अनुसूचित जमातीत १६ ग्रामपंचायती आरक्षित असून त्यात ०८ महिला तर ०८ पुरुष आहे.त्या पुढील प्रमाणे आहे – प्रथम महिला आरक्षण खिर्डि गणेश,नाटेगाव,भोजडे,शिंगणापूर,मढी बू.,मनेगाव,काकडी -मल्हारवाडी,बहादरपुर आदींचा समावेश आहे.तर गावाचे नाव व अनुसूचित जमातीचे पुरुष जागा पुढे दर्शवले सुरेगाव,वारी,घोयेगाव,खोपडी,बहादराबाद,राजंणगाव देशमुख,जवळके,शहापूर आदींचा समावेश आहे.
या शिवाय नागरीकांचा मागास प्रवर्ग यासाठी २० जागा राखीव असून त्यात ५० टक्के महिला १० तर ५० टक्के पुरुष १० असे प्रमाण ठरवले आहे.त्यात प्रथम महिला असलेल्या गावांची नावे पुढील प्रमाणे-कारवाडी,सोनारी,वडगाव,गोधेगावं,बोलकी,दहिगाव बोलका,धारणगाव,कान्हेगाव,डाऊच बू.जेऊर कुंभारी आदींचा समावेश आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष चासनळी,ओगदी,ऐसगाव,तीलवणी,उक्कडगाव,कोकमठाण,माहेगाव देशमुख, मढी खु.,देर्डे कोऱ्हाळे, पोहेगाव आदींचा समावेश आहे.
तालुक्यात सर्वसाधारण सरपंच पदाच्या एकूण २९ जागा असून यात १५ महिला तर १४ पुरुष आहेत.त्यात पुढे प्रथम महिला आरक्षण दर्शवले आहे-मायगाव देवी,मळेगांव ठडी, रवंदे,मंजूर,हांडेवाडी,सांगवी भुसार,ब्राम्हणगाव,करंजी बू.,टाकळी,कासली,लौकी,हिंगणी,देर्डेचांदवड,चांदेकासारे,धोंडेवाडी आदींचा समावेश आहे.यात पुढे सर्वसाधारण पुरुष सरपंच दर्शवले आहे – मोर्वीस,धामोरी,बक्तरपुर,वेळापूर,शिरसगाव-सावळगाव,संवत्सर,सडे,कुंभारी,शहाजापुर,चांडगव्हाण,जेऊर-पाटोदा,डाऊच खुर्द,अंजनापुर ,वेस – सोयगाव आदींचा समावेश आहे.