पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या मुख्यमंत्र्यांचे साई दर्शन !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री प्रेमसिंह तमांग यांनी शिर्डी येथे येवून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से.यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

दरम्यान यावेळी सिक्कीमचे भिम हांग लिंबु,इमारत आणि गृह निर्माण व कामगार श्रमिक मंत्री एम.एन.शेरपा,विधानसभा अध्यक्ष व श्रीमती राज कुमारी थापा,विधानसभा उपाध्यक्ष तसेच संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे आदी उपस्थित होते.
