कोपरगाव तालुका
..या ग्रामपंचायतीने दिव्यांगांना केले वस्तुंचे वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे आर्थिक दुर्बल घटकांसह दिव्यांग व्यक्तीवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था दानशुर नागरीक पुढे येऊन त्यांना मदत करत आहे. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायतीने आपल्या उत्पनांतुन दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या ५ टक्के निधी अतंर्गत गावातील दिव्यांगांना सरपंच नानासाहेब चौधरी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे.
समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण,सवलती,सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे.
आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ एप्रिल रोजी हॅन्ड सॅनिटायझर सह साखर,शेंगादाणे,साखर,गोडतेल तुरदाळ,गुळ प्रत्येकी २ किलो तसेच चहा पावडर, साबण, खोबरेल तेल, मठ दाळ, जिरे, मिरची ,अशा १३ जिवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यावेळी गणेश चंद्रभान चौधरी,साळुबा हरी रणशुर,वंदना सुर्यभान शेजवळ,शारदा अंबादास पवार,सिंधुताई सखाराम निकम,अलका दत्तात्रय वाघ या दिव्यांग लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेतला. घरातच रहा, तोंडाला मास्क बांधा, हॅन्ड सॅनिटायझरचा वापरा करा, घाबरून जाउ नका, अशा सुचना डॉ.खरे यांनी यावेळी दिल्या आहेत.
सदर प्रसंगी ग्रामसेविका अहिरे मॅडम, गौतम सहकारी बॅंकेचे संचालक सोहबलाल शेख, राजेंद्र जाधव, पोलिस पाटील,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात आला आहे.