कोपरगाव तालुका
आदिवासींच्या सवलती धनगर समाजाला द्या-मागणी

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची या वर्षी ३०० वी जयंती येत्या ३१ मे रोजी संपन्न होत असून या पवार पर्वावर धनगर समाजातील मुलिसांठी आदिवासींना देण्यात शैक्षणिक सेवा सुविधा पुरविण्यासह विविध मागण्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या कोपरगाव येथील शाखेचे सचिव रमेश टिक्कल यांनी आ.आशुतोष काळे यांचेकडे केली आहे.

‘कोपरगाव अहिल्यादेवी यांच्या नावाने चौक व्हावा,त्या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारला जावा,मुलींच्या वसतिगृहातील मोकळा भूखंड मिळावा,इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये त्यांना राखीव जावा ठेवण्यात याव्यात,तालुक्यात लोकसंख्येच्या पटीत लोकप्रतिनिधित्व मिळावे”-किरण थोरात,युवा कार्यकर्ते,पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज संघटना.
धनगर समाज हा महाराष्ट्रात भटक्या जमातीच्या श्रेणीत येतो.धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून (NT) आरक्षण आहे.धनगर समाजाच्या काही उपजातींना अनुसूचित जमाती म्हणून ओळखले जाते.सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यांत धनगर समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचे प्रमाण वेगवेगळे आहे.महाराष्ट्रात धनगर समाज हा भटक्या जाती-क (एनटी-सी) या प्रवर्गात मोडतो.त्यांना सामाजिक व शैक्षणिक आरक्षण ३.५% दिलेले आहे.कर्नाटकात धनगर समाज हा कुरुबा या नावाने ओळखला जातो.त्याचप्रमाणे संपुर्ण भारतात विविध नावाने ओळखला जातो.मात्र त्यांना अद्याप सरकार त्या योजना देत नाही त्यामुळे या समाजात मोठा असंतोष आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही.

कोपरगाव येथील मागणी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या कोपरगाव येथील शाखेने आ.आशुतोष काळे यांचेकडे विविध मागण्या केल्या आहेत.त्यात कोपरगाव अहिल्यादेवी यांच्या नावाने चौक व्हावा,त्या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारला जावा,मुलींच्या वसतिगृहातील मोकळा भूखंड मिळावा,इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये त्यांना राखीव जावा ठेवण्यात याव्यात,तालुक्यात लोकसंख्येच्या पटीत लोकप्रतिनिधित्व मिळावे आदी मागण्या संघतेंचे सचिव रमेश टिक्कल यांनी केल्या आहेत.