कोपरगाव तालुका
जलजीवन योजनांचा कोपरगाव तालुक्यात फज्जा ?

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्र व राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन अभियानातील पाणी पुरवठ्याचे कोपरगाव तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची १२ तर जिल्हा परिषदेच्या ताब्यातील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत ५२ पैकी केवळ १३ कामे पूर्ण होऊन हस्तांतरीत झाली असून २३ कामे अंशतः बाकी असून अद्याप २९ कामे मोहत्या प्रमाणावर अपूर्ण असून या योजनेचा कोपरगाव तालुक्यात निधी अभावी फज्जा उडाला असल्याची धक्कादायक बाब हाती आली असून ठेकेदारांची देणी थकल्याने सदर योजना बासनात गुंडाळल्या असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या योजना खरेच पूर्ण होणार का असा ऐन उन्हाळ्यात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

“मोर्वीस शिवारात पाच किं.मी.जलवाहिनी गरजेची असून मात्र ती ठेकेदार करून देत नाही परिणामी ग्रामस्थांना पाणी देता येत नाही.ग्रामस्थांचे नको ते बोल ऐकावे लागत आहे.त्यांना ही कारणे देऊन ‘आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नसल्या”चे सांगितल्यावर तर ते “तुम्ही जीव द्या” असे सांगत असल्याचे दुःख व्यक्त केले आहे.त्यामुळे “आता आमच्या बरोबर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जीव द्यावा” अशी मागणी महिला सरपंच संगीता पारखे यांनी केली आहे.त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,’केंद्र व राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन अभियानातील पाणीपुरवठ्याचे कामे करणाऱ्या ठेकेदारांनी मागील काही महिन्यांपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.या ठेकेदारांची गेल्या चार महिन्यांपासून ७२ कोटी रुपयांची देयके अडकली आहेत,ग्रामपंचायतीच्या लोकवर्गणीची १० टक्के रक्कमही ठेकेदारांकडून कपात केली जात आहे,प्रशासन मनमानी करत सुधारित वाढीव कामे करण्याचा दबाव टाकत आहे तसेच जागेअभावी रखडलेल्या कामांसाठीही दंडात्मक कारवाई करत असल्याने त्रस्त झालेल्या ठेकेदारांनी हा आंदोलनाचा पवित्र घेतला घेतल्याचे नुकतेच उघड झाले आहे.नगर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या एकूण ८३० योजना सन-२०२० मध्ये मंजूर झाल्या होत्या.त्यापैकी २१० योजना पूर्ण झाल्या असून ४३ हस्तांतरीत झाल्या असल्याचे प्रशासन सांगत असले तरी त्या योजना जास्त असल्याचे समजत आहे.यात ७५-१०० टक्के काम पूर्ण झालेल्या योजनांची संख्या ४०० तर ५०-७५ टक्के काम पूर्ण झालेल्या योजनांची संख्या १६७ तर २०-२५ टक्के काम पूर्ण झालेल्या योजनांची संख्या ४९ तर ००-२५ टक्के काम पूर्ण झालेल्या योजनांची संख्या केवळ ०४ आहे.सरकारने या योजना केवळ चार वर्षात म्हणजेच मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते.मात्र चार वर्षे उलटूनही या योजना पूर्ण झालेल्या नाही.

”कोपरगाव तालुक्यातील सर्व जलजीवन योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे देणे गरजेचे होते.त्यामुळे कामाची गुणवत्ता टिकली असती मात्र तसे केले नाही.उलट सदर योजनांचे पाच कोटींच्या आत तुकडे कोणी केले ? का केले ? त्यातील नेमके अर्थकारण काय आहे.त्यामुळे हा निधी योजना पूर्ण करण्यास कमी पडत असल्याचे सांगून सदर योजना जिल्हा परिषदेकडे गेल्याने हा राडा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी केला आहे.
दरम्यान यात कोपरगाव तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची १२ तर जिल्हा परिषदेच्या ताब्यातील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत ५२ पैकी केवळ १३ कामे पूर्ण होऊन हस्तांतरीत झाली असून २३ कामे अंशतः बाकी असून अद्याप २९ कामे मोठ्या प्रमाणावर अपूर्ण असून या योजनेचा कोपरगाव तालुक्यात निधी अभावी फज्जा उडाला असल्याची धक्कादायक बाब हाती आली आहे. ठेकेदारांची देणी थकल्याने सदर योजना बासनात गुंडाळल्या असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे या योजनेत १० टक्के लोकवर्गणी ग्रामपंचायतीची गृहीत धरली आहे.त्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीची ऐपत नसताना तसे ठराव दिले आहे हे विशेष ! आता ही लोकवर्गणी ठेकेदार यांचे खिशातून सरकारने वळती केली असल्याने ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहे.त्यामुळे शिल्लक काम करण्यात ते तयार नाही.सदर काम केले तर आपली १० टक्के रक्कम कापून घेतली जाणार असल्याची साधार भीती त्यांना वाटत आहे परिणामी ते उर्वरित काम करण्यास धजत नाही.त्यांची जवळ पास १०० कोटींची बिले थकली आहे.या पार्श्वभूमीवर आज दुपारी ०३ वाजता कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी ग्रामपंचायत सरपंच,कार्यकर्ते,ग्रामपंचायत विकास अधिकारी,ठेकेदार आदींची संयुक्त बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित केली होती.

सदर जल जीवन योजनेचे सर्व ठेकेदार अधिकाऱ्यांना जुमेनासे झाले आहे.सदर बैठकीत बहुतांशी ठेकेदार अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे अनेकांनी त्यांच्या प्रतीनिधीवर तोंडसुख घेतले असून त्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी केली आहे.त्यावर गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे ठेकेदार यांच्यात खळबळ उडाली आहे.
त्यावेळी कोपरगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप दळवी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कोपरगाव उपविभागाचे उपअभियंता ए.व्हीं.लोहारे,जलजीवन मिशनच्या कोपरगाव उपविभागाचे उपअभियंता सी.डी.लाटे,सहाय्यक अभियंता एस.एस.मेटकरी,आश्विन वाघ,चांदेकसारे सरपंच किरण होन,शहाजापुर सरपंच शरद वाबळे,सोनारी सरपंच बद्रीनाथ सांगळे,बहादराबाद माजी सरपंच विक्रम पाचोरे,काकडीच्या सरपंच पूर्वा रवींद्र गुंजाळ,मोर्विसच्या सरपंच संगीता पारखे,जनार्दन पारखे,सरपंच अजिनाथ खटकाळे आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने सरपंच,ग्रामपंचायत विकास अधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी बहुतांशी सरपंच यांनी उन्हाळा सुरू झाल्याने व त्याची दाहकता जाणवू लागली आसल्याने ग्रामस्थांचा रोष त्यांच्यावर येत असल्याचे रडगाणे गायले असून अपूर्ण योजना आणि ठेकेदार यांची मुजोरी चर्चेत आली आहे.सदर ठेकेदार अधिकाऱ्यांना ऐकेनासे झाले असल्याचे उघड झाले आहे.सदर बैठकीत बहुतांशी ठेकेदार अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे अनेकांनी त्यांच्या प्रतीनिधीवर तोंडसुख घेतले असून त्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी केली आहे.त्यावर गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत.
सदर प्रसंगी मोर्विस येथील महिला सरपंच यांनी दोन महिन्यापासून काम जल जीवन योजनेचे काम बंद असल्याची तक्रार केली असून गावाला पाणी मिळत नाही.सात लाख खर्चून विहिरीसाठी दोन आर क्षेत्र घेऊन विंधन विहीर खोदता आलेली नाही.पाच किं.मी.जलवाहिनी गरजेची असून मात्र ती ठेकेदार करून देत नाही परिणामी ग्रामस्थांना पाणी देता येत नाही.ग्रामस्थांचे नको ते बोल ऐकावे लागत आहे.त्यांना ही कारणे देऊन आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नसल्याचे सांगितल्यावर तर ते “तुम्ही जीव द्या” असे सांगत असल्याचे दुःख व्यक्त केले आहे.त्यामुळे “आता आमच्या बरोबर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी आमच्या सोबत जीव द्यावा” अशी मागणी करून आपल्या अधिकाऱ्याविरुद्ध असलेल्या रागास वाट मोकळी करून दिली आहे.त्यामुळे सभागृहात सर्वत्र खसखस पिकली होती.
सोनारीचे सरपंच बद्रीनाथ सांगळे यांनी आपला अनुपस्थित असलेल्या ठेकेदारावर राग काढताना ठेकेदार आमचे ऐकत नाही असा राग आळवला असून बैठक बोलावून अधिकाऱ्यांचे ठेकेदार ऐकत नसतील तर तुमचा उपयोग काय ?त्यांचेवर काय कारवाई करणार ? त्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी केली आहे.व आम्ही आता आठ दिवस वाट पाहू अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
सदर प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी जवळके,शहापूर,बहादराबाद आदी गावांसाठी असलेले तीन गावांची संयुक्त पाणी योजनेचा बोऱ्या वाजला असून सदर योजनेचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी केली आहे.जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.नुसते ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना बोल लावून उपयोग होणार नाही.सदर योजनेत ग्रामपंचायतची १० टक्के लोकवर्गणी हा ग्रामपंचायतीच्या गळ्याचा फास बनला आहे.विशेष म्हणजे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी तसे ठराव करून दिले आहे हे विशेष ! त्यामुळे तो १० टक्क्यांचा निधी आता सरकार ठेकेदार यांच्या बिलातून वर्ग करून घेत आहे.त्यामुळे ठेकेदार धास्तावले आहेत.ते आता कामे करण्यास तयार नाही हे वास्तव आहे.मात्र यावर कोणीही बोलत नाही.त्यांनी तो निधी राज्यातील आणि नगर जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत तो भरण्यास सक्षम नसल्याचे सांगितले आहे.याबाबत राज्याचा धोरणात्मक निर्णय आवश्यक असून,कोपरगाव तालुक्यातील सर्व जलजीवन योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे देणे गरजेचे होते.त्यामुळे कामाची गुणवत्ता टिकली असती मात्र तसे केले नाही.उलट सदर योजनेचे पाच कोटींच्या आत तुकडे कोणी केले ? का केले ? त्यातील अर्थकारणावर नेमके बोटं ठेवले आहे.त्यामुळे हा निधी योजना पूर्ण करण्यास कमी पडत असल्याचे सांगून सदर योजना जिल्हा परिषदेकडे गेल्याने हा राडा झाल्याचा आरोप केला आहे.राज्यास जिल्हा परिषदेकडे असलेल्या पाणी योजनांना आर्थिक तरतूद करावी लागेल त्यासाठी लोकप्रतिनिधी आ.आशुतोष काळे सोबत तालुक्यातील सर्व सरपंच,पदाधिकारी,ग्रामपंचायत विकास अधिकारी आदींची संयुक्त बैठक लावण्याची मागणी गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे.त्यातून आर्थिक अधिवेशनात यावर चर्चा होऊन मार्ग निघू शकतो असे सुचवले आहे.त्यावर सर्व सरपंच आणि पदाधिकारी यांनी होकार दिला असल्याचे दिसून आले आहे.