जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ लाच प्रकरणातील दोन आरोपीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)
  

कोपरगाव येथील खरेदी केलेली सदनिका सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यासाठी फिर्यदिकडून ६.५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी अटक केलेला तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांना काल कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्याल्यासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान लाचलुचपत प्रकरणी व भ्रष्टाचाराच्या वाढणाऱ्या घटनांची दखल घेऊन कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी घेतली असून या प्रकरणी त्यांनी तातडीची बैठक तहसील कार्यालयाचे सभागृहात दुपारी ०१ वाजता बोलावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   कोपरगाव तालुक्यातील भ्रष्टाचार उग्र स्वरूप धारण करू लागला आहे.त्यात अनेकांचे हकनाक बळी जात आहे.सामान्य नागरिकांना नागविण्याचे काम दिवसा ढवळ्या सुरू आहे.त्यात तहसील कार्यालय,पोलिस,पंचायत समिती,नगरपरिषद आदिंचा समावेश असून त्याकडे राजकारणी केवळ उघड्या डोळ्यांनी पाहत असून हा प्रशासनातील नंगा नाच जनतेला मोठी डोकेदुखी ठरत आहे.अशीच घटना दोन दिवसापूर्वी घडली होती.यातील आरोपी तलाठी गणेश सोनवणे याने आपला सहकारी तथा झिरो तलाठी (यास शासनाची कोणतीही परवानगी नाही मात्र तालुक्यात सर्रास हे चित्र आहे) करण जगताप याच्या हस्ते  तक्रारदाराची सदनिका नोंदविण्यासाठी ६ हजार ५०० रुपयांची लाच मागितली होती व ती केली तरच सदनिका नोंदवली जाईल असे म्हटले होते.त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने या प्रकरणी नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.त्यामुळे या प्रकरणी त्यांनी रीतसर पूर्वनियोजित सापळा लावला होता.

   दरम्यान परवा सकाळी दि.०२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११-१२ वाजता हा सापळा लावला असता तलाठी यांचा पित्या या सापळ्यात अलगत अडकला होता.त्याने सदर रक्कम मिळाल्यावर आपला वरिष्ठ असलेला तलाठी यास दूरध्वनी करून सदर ०६ हजार ५०० रुपयांचा मलिदा सुखरूप पोहच झाला असल्याचे त्यास कळवले होते.दरम्यान पाळतीवर असलेल्या लाच लुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले होते.त्यातून त्या दोघांना साई रेसिडेन्सी इमारतीचे समोर असलेल्या पार्किंग समोर अटक झाली होती.

दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या.डी.बी.अलमले यांचे समोर हजर केले असता आरोपींच्या वतीने ऍड.शंतनु धोर्डे यांनी युक्तिवाद केला होता.तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता श्री गुळबुळे यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोनवणे व करण जगताप या दोन्ही आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

   दरम्यान आज मिळालेल्या माहितीनुसार  या दोन्ही आरोपींना आज लाचलुचपत विभागाचे पो.हे.कॉ.संतोष शिंदे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी पुन्हा हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.दरम्यान या दोन्ही आरोपींनी आपल्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज न्यायालयासमोर हजर केला असून त्याची सुनावणी आगामी सोमवार दि.०६ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

   दरम्यान लाचलुचपत प्रकरणी व भ्रष्टाचाराच्या वाढणाऱ्या घटनांची दखल घेऊन कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी घेतली असून या प्रकरणी त्यांनी तातडीची बैठक तहसील कार्यालयाचे सभागृहात दुपारी ०१ वाजता बोलावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close