गुन्हे विषयक
शेतकऱ्यांवर सुलतानी संकट,गुन्ह्याची मागणी

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
एक महिन्यापूर्वी सोनेवाडी विद्युत रोहित्राची तार आणि त्यातील इंधनाची चोरी होऊन एक महिना होत नाही तोच कोपरगाव तालुक्यात ऐन रब्बी पिकांचा हंगाम जोरात सुरू असताना व त्यास शेतकऱ्यांना पुरेशी वीज नसताना आणखी एक सुलतानी संकट समोर ठाकले असून सूरेगाव या गोदावरी काठच्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याची घटना उघड झाली असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी चोरट्यांचा तालुका पोलिसांनी शोध घेण्याची जोरदार मागणी केली आहे.

दरम्यान या प्रकरणी या पूर्वी मे महिन्यात किसन वाबळे,जगधणे, मोकळ,किसन आहेर,सुनील मोकळ आदी शेतकऱ्यांचे नऊ विद्युत पंप चोरीस गेले होते त्यावेळी शेतकऱ्यांनी गुन्हे दखल न केल्याने या चोरट्यांचे धाडस वाढले आहे.
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या महावितरण कंपनीच्या ३६ हजार ६०० रोहीत्रातील ऑईल आणि तांब्याची तारेची चोरी झाली होती.त्यावेळी संबंधित अभियंत्याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.वर्तमानात रब्बी पिकांचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देण्याची नितांत गरज आहे.अशा वेळी चोरट्यांनी आपला हात उचलून घेतला असल्याचे दिसून आले असून त्यांनी विद्युत पंप आणि विद्युत रोहित्रांच्या साहित्याची चोरी ही सामान्य बाब ठरली असून शेतकऱ्यांना त्यामुळे मोठी किंमत चुकवावी लागत आहे.अशीच घटना नुकतीच सुरेगाव हद्दीत गट क्रमांक २६ मध्ये सुमनबाई मारुती गुजर,पर्वताबाई खंडेराव गुजर यांची अनुक्रमे १० व ७.५ अश्वशक्ती,तर अशोक रामभाऊ आहेर यांच्या गट क्रमांक २४ मधील,रंजनाबाई नारायण जगधने यांच्या गट क्रं.२३ मधील,तर कृष्णा सोमा तळपाडे यांच्या त्याच गट क्रमांक मध्ये काल रात्री सुमारास शेतात कोणी नाही ही संधी साधत चोरट्यांनी विद्युत पंपामधील तांब्याची सुमारे ५०-६० हजार रुपयांची तार चोरून आपला डाव साधला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही मात्र घटनास्थळी पोलीस अधिकारी यांनी भेट दिली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी आज उशिरा दिली आहे व या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान या प्रकरणी या पूर्वी मे महिन्यात किसन वाबळे,जगधणे,मोकळ,किसन आहेर,सुनील मोकळ आदी शेतकऱ्यांचे नऊ विद्युत पंप चोरीस गेले होते त्यावेळी शेतकऱ्यांनी गुन्हे दखल न केल्याने या चोरट्यांचे धाडस वाढले असून यावेळी त्यांनी आणखी मोटारी चोरी करून पोलिसांना वाकुल्या दाखवल्या आहेत.