जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विधिमंडळ कामकाज

शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत वीज जोड द्या…यांची मागणी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी सोलर उर्जेचा वापर आणि सोलर पंप देण्याचा निर्णय अतिशय महत्वाचा असला तरी महावितरणकडे शेतकरी नवीन वीज जोडणीची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना प्राधान्याने सोलर पंप मागणीचे अर्ज भरण्यासाठी सांगितले जात आहे.मात्र शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध होण्यासाठी जवळपास चार ते सहा महिन्याचा कालावधी लागतो.त्या दरम्यान शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात अडचणी येवून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.त्यासाठी शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत नवीन वीज जोड द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच केली आहे.

  

“शेतकऱ्यांना सोयाबीन,कांदा आदी प्रमुख पिके व जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांच्या शेतमालाला व दुधाला योग्य दर मिळावा”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.

   वर्तमानात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये जोरात सुरू आहे.विधानपरिषदेमध्ये काल प्रा.राम शिंदे यांच्या सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो मंजूर झाला आहे.भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली आहे त्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी एका प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यात शेतकऱ्याचा सौर पंप आणि शेतकऱ्यांचा वीज जोडणीचा प्रश्न आहे.

   त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”महायुती सरकारने राज्यातील जनतेच्या सर्वागीण हिताला प्राधान्य देवून अनेक महत्वाकांशी निर्णय घेतले असून शेतक-यांच्या अडचणी दुर करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार देण्याचा सरकारकडून निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न केले जात आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना ७.५ एचपी वीजपंपाचे वीज बिल माफ करून भविष्यात वीज बिल भरावेच लागणार नाही यासाठी अनुदानावर वीज सोलर पंप दिले जात आहे.हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय असून त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज बिलाचा खर्च कायमचा दूर होवून त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेच.त्याच बरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होवून जंगली जनावरांच्या दहशतीखाली रात्री पिकांना पाणी देण्याचा त्रास कायमचा बंद होवून जंगली जनावरांपासून त्यांची सुटका होणार आहे.सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे परंतु जोपर्यंत सोलर पंप शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नवीन वीज जोड मिळणे गरजेचे आहे.तसेच नदीकाठी अनेक शेतकरी जागा घेवून विहीर बांधतात व त्या ठिकाणाहून शेतीसाठी पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणतात त्या ठिकाणी सोलर पंप बसविणे शक्य नाही त्या शेतकऱ्यांना देखील नवीन वीज जोड द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली.

   दरम्यान त्यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित करताना म्हंटले आहे की,”कोपरगाव मतदार संघातील २२० केव्हीचे सबस्टेशन ओव्हरलोड असून त्यामुळे वीज पुरवठ्यात खंड पडतो त्याचा त्रास वीज ग्राहकांना व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाला होवून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.कोपरगाव मतदार संघाच्या शेजारीच सिन्नर तालुक्यातील शहा येथे २३२ के.व्ही.ए.चे सबस्टेशन कार्यान्वित झाले आहे.त्या माध्यमातून ओव्हरलोड असलेल्या २२० केव्ही सबस्टेशनची क्षमता वाढ करावी व सुरु असलेल्या कामातील अडचणी दूर करून त्या कामांना गती द्यावी.

   दरम्यान शेतकऱ्यांना सोयाबीन,कांदा पिकाच्या माध्यमातून व जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.याला एकमेव कारण मागील काही वर्षापासून शेतमालाला व दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत नसलेला अपेक्षित दर.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांच्या शेतमालाला व दुधाला योग्य दर मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आयात-निर्यात धोरणात काही बदल करणे शक्य असल्यास ते बदल करून त्यांना अपेक्षित दर देवून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी आ.काळे यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मांडून सभागृहाचे लक्ष वेधल्याबद्दल शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close