निधन वार्ता
हरिभाऊ आढाव यांचे निधन
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या सुभद्रानगर येथील रहीवाशी हरिश्चंद्र (हरिभाऊ) रघुनाथ आढाव (वय-७०)यांचे काल सायंकाळी ७.०७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.
दरम्यान त्यांचा अंत्यविधी आज अमरधाम कोपरगाव येथे सकाळी १०.३० वाजता शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते रघुनंदन मंगल कार्यालयाचे संचालक विकास हरिभाऊ आढाव यांचे पिताश्री होते.