धार्मिक
…या ठिकाणी संपन्न होणार दत्त जयंती !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य भगवान दत्तात्रय आणि त्यांच्या दत्त संप्रदायाने केले आहे त्यांची जयंती कोपरगाव शहर आणि तालुक्यासह भारत वर्षात सर्वत्र साजरी केली जात आहे.कोपरगावातील ओमनगर येथील उपनगरात आज सायंकाळी ६.३० वाजता मोठ्या उत्साहात साजरी केली जात असल्याची माहिती तेथील कार्यकर्ते वैभव गिरमे आणि माजी नगरसेविका दीपा गिरमे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते.
हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार (डिसेंबर) मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.दत्त अथवा दत्तात्रेय हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते.दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्नी अनुसया यांचे पुत्र असून त्यांना दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत.हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त,सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू,ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात.पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा,विष्णू व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले.त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लीनाथ,बाण,कालिदास इत्यादींनी तसेच शूद्रकाने केला आहे.दत्त्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे अशी मान्यता आहे.स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले.म्हणून त्यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
कोपरगाव येथील ओमनगर येथील नगरपरिषदेच्या माजी नगरसेवक दिपा गिरमे व त्यांचे पती व भाजप कार्यकर्ते वैभव गिरमे यांनी सव्वीस वर्षापूर्वी येथील लक्षवेधी मंदिराची स्थापना केली होती त्याला आज सव्वीस वर्ष संपन्न होत आहे.या मंदिराच्या कामासाठी दक्षिण भारतातील मंदिर शैली वापरण्यात आली आहे.त्यानिमित्ताने आज आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी ओमनगर,निवारा,सुभद्रानगर,द्वारकानगरी,सहयाद्री कॉलनी,सुखशांती नगर,गिरमे सिटी,साईप्रभानगर,साई सिटी,रिद्धीसिद्धीनगर,टाकळी रोड आदी परिसरातील भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे वैभव गिरमे व दिपा गिरमे यांनी शेवटी केले आहे.