गुन्हे विषयक
हुंड्यासाठी महिलेचा छळ,चार जणांविरुद्ध गुन्हा

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेली मात्र माहेर धुळे येथील असलेली महिलेच्या पती यांचेत काही नाजूक कारणावरून अडचण येत असल्याने त्याबाबत फिर्यादी महिलेनं आपल्या सासू कडे तक्रार केली असता तिला खाजगी कारणावरून त्रास देऊन तिच्या अंगावरील दागिने काढून घेऊन तिला माहेरी आणून सोडून तिच्या माहेरच्या नातेवाईकांकडून नांदण्यासाठी पाच लाखांची मागणी केला असल्याचा गुन्हा तिचा पती,सासरे,सासू,नणंद आदी चार जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

“आपले लग्न झाल्यानंतर काही नाजूक कारणावरून अडचण येत असल्याचे लक्षात आले होते.दरम्यान याबाबत आपण ही बाब आपली सासू अपर्णा हिचे लक्षात आणून दिली होती.मात्र याचा विधायक परिणाम होण्याऐवजी विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून आले आहे.
भारतात हुंडा देणे किंवा घेणे दोन्ही बेकायदेशीर आहे.हुंडाचा अर्थ आहे जी संपत्ती,लग्नाच्या वेळी वधूच्या कुटुंबातर्फे वराला दिली जाते.हुंडाला उर्दूमध्ये जहेज म्हणतात.युरोप,भारत,आफ्रिका आणि जगाच्या अन्य भागात हुंडा पद्धतीचा मोठा इतिहास आहे.भारतात याला दहेज,हुंडा किंवा वर-दक्षिणाच्या नावाने ओळखले जाते.तसेच वधूच्या कुटुंबातर्फे नकद किंवा वस्तूच्या रूपात हे वराच्या कुटुंबातला वधूबरोबर दिले जाते.आजच्या आधुनिक काळात हुंडा नावाचा राक्षस सर्व दूर पसरला आहे.मागासलेल्या भारतीय समाजात हुंडा प्रथा आत्तापर्यंत विक्राल रूपात वावरत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यातील कोपरगाव येथील माहेर व धुळे येथील सासर असलेली फिर्यादी महिला हिचे लग्न धुळे येथील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या युवकांशी काही वर्षांपूर्वी झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस गेल्यावर सासरच्या मंडळीनी आपले खरे रूप दाखविण्यास सुरुवात केली असल्याचे फिर्यादी महिला स्नेहल हिचे म्हणणे आहे.या बाबत तिने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,”आपले लग्न झाल्यानंतर आपल्यात आणि पतीत काही नाजूक कारणावरून अडचण येत असल्याचे लक्षात आले होते.दरम्यान याबाबत आपण ही बाब आपली सासू अपर्णा हिचे लक्षात आणून दिली होती.मात्र याचा विधायक परिणाम होण्याऐवजी विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून आले आहे.त्यात आपल्या सासूने आपल्याला घाणघाण शिवीगाळ करून घरात काहीना काही कारणावरून शिवीगाळ सुरू झाली होती.
दरम्यान यानंतर आपल्या सासूने गोड गोड बोलून आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले होते व आपल्याला माहेरी आणून सोडले होते.त्यानंतर आपल्या माहेरच्या माणसांना म्हणाले की,”तिला नांदवायचे असेल तर माहेराहून पाच लाख रुपये आण” असे म्हणून आपल्याला नांदविण्यास नकार दिला आहे.त्यामुळे फिर्यादी महिलेनं या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन धूळे येथील आरोपी नवरा अभिषेक पाठक,सासरा अनील पाठक,सासू अपर्णा पाठक,नणंद गौरी पाठक आदी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक- 53/2024 भारतीय दंड विधान कलम 498 (अ),504,34 सह प्रमाणे आरोपी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.बी.एच.तमनर हे करीत आहेत.