जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

वर्पे यांना निवडून द्या तुम्हाला विकास काय असतो ते दाखवतो-आश्वासन

कोपरगाव -(प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा मतदार संघात आपण राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वरर्पे यांना निवडून द्या आम्ही या मतदार संघाला केंद्रातून निधी आणून नक्कीच विकास करू असे प्रतिपादन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज कोपरगाव येथे आयोजित सांगता सभेत बोलताना केले आहे.

आपल्या सांगता सभेत बोलताना खा.भाऊसाहेब वाकचौरे दिसत आहेत.

“कोपरगाव विधानसभा निवडनुकीच्या आदल्या रात्री ही आमचे विरोधी मंडळी चॉकलेट घेऊन येतील ते घ्या.ते मतदारांचे आहे ते घ्या ते आपणच त्यांचेकडे ठेवायला दिले होते,पण आत गेल्यावर मात्र तुतारीचे बटण दाबून विजयी करा”- संदीप वर्पे,उमेदवार,राष्ट्रवादी शरद पवार गट.

काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाला खा.भाऊसाहेब वाकचौरे हे निवडून आल्यावर गती आली व कालवा कृती समितीने ही लढाई जिंकून कालव्यांचे पाणी आले असल्याचे सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असून कोपरगाव शहरातील विविध प्रभागात महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अधिकृत उमेदवार संदीप वर्पे यांच्या प्रचारार्थ आज वीर सावरकर चौकात सांगता सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे हे होते.

आपल्या सांगता सभेत बोलताना कोपरगाव विधानसभेचे उमेदवार संदीप वर्पे दिसत आहेत.

सदर प्रसंगी बाळासाहेब गायकवाड यांनी आपण प्रत्येक सांगता सभा बारामतीत घेतली आणि त्या ठिकाणी अजित पवार विजयी झाले आज आपण संदीप वर्पे यांच्या बरोबर आहे.त्यांचा विजय नक्की होणार आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,संजय सातभाई,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे,शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास वहाडणे,उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,माजी तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,श्रीरंग चांदगुडे,ऍड.दिलीप लासुरें,उबाठाचे शहर प्रमुख सनी वाघ,माजी शहराध्यक्ष भरत मोरे,आर.पी.आय.चे.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशुर,रावसाहेब टेके,शब्बीर शेख,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण संदीप वर्पे  यांना सत्ता द्या आपण समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करण्यासाठी प्रयत्न करू.गोदावरी नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे.गोदावरीचे ब्लॉक रद्द झाले आहे.शेती सिंचनाचे पाणी उद्योगाला वाटून दिले आहे.या नेत्यांनी आपली हाताची घडी, तोंडावर बोट ठेवण्याची भूमिका घेतली.असे निष्क्रिय नेते आहे.त्यांना घरची वाट दाखवा असे सांगून आपण कोपरगाव सह,श्रीरामपूर,संगमनेर,शिर्डी साठी ८० कोटींची भूमिगत विद्युत वाहक योजना मंजूर केली होती त्याचे काय झाले समजायला तयार नाही.आपण या शहरासाठी ४२ कोटींची योजना मंजूर केली त्याचा निधी कोठे गेला हे समजायला तयार नाही असा आरोप केला आहे.याला निव्वळ नेते जबाबदार नाही तर तुम्ही मते विकत आहे.त्यामुळे नालायक लोक खुर्चीवर आणि सत्तेवर बसत असून त्यामुळे राज्यांचे आणि देशाचे वाटोळे होत आहे.

   सरकारच्या कृषी धोरणाबाबत बोलताना ते म्हणाले की,”निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्राहककेंद्री कृषीविषयक धोरणे राबवल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. सरकारच्या आयात-निर्यात धोरणातील धरसोडीमुळे कांदा, सोयाबीन,कापूस,कडधान्ये यांचे उत्पादन घेणारा शेतकरी नाराज आहे.त्याची नाराजी दूर करण्यासाठी मोफतच्या,अनुदानांच्या रेवड्या उडवल्या जात आहेत.हे काही निरोगी कृषी व्यवस्थेचे लक्षण नाही.

सदर प्रसंगी सुहास वहाडणे यांनी,”तालुक्याचे पाणी आ.काळे व त्यांचे पिताश्री माजी आ.अशोक काळे यांनी घालविण्याचा आरोप केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जाहीर करून उभा केला नाही.शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव देत नाही असा आरोप केला आहे.

   शिवाजी ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यात लोकशाही नाही.शेतकऱ्यांनी आम्हाला साथ दिली पण पत्रकारांनी बातम्या दिल्या नाही.नेत्यांच्या आदेशाने व्ही.डी.ओ.नष्ट केले आहे.सभेच्या ठिकाणी जामर बसवले असल्याने सभा लाईव्ह होत नसल्याचा आरोप पोलीस प्रशासनावर केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिमेचे पाणी मराठवाड्यात नेणार असल्याचे जाहीर केले पण लोणी येथील व आ.काळे यांनी एक शब्द काढला नाही.शेतकऱ्यांच्या सीलिंग कायद्याखाली जमा केल्या आणि नंतर ब्लॉकचे पाणी काढून घेतले आहे.शहरांचे पिण्याचे पाणी आरक्षण भाम भावली वर का टाकत नाही.औद्योगिकीकरण करण्याचे अजित पवार यांनी खोटे आश्वासन दिले आहे.
लाख मतांनी विजयी होणार असल्याच्या गप्पा सुरू होत्या पण आता मतदार संघाचा अंदाज आल्याने या गप्पा कमी झाल्या आहे.त्यामुळे आता ५०० रुपयांचे चॉकलेट आता १०००, रुपये होण्याची शक्यता असल्याचा आरोप केला आहे.विजय वहाडणे आणि त्यांचे सहकारी,नामदेवराव परजणे त्यांचे कार्यकर्ते नक्कीच तुतारीचे बटण दाबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.कोपरगाव मतदार संघाचा विकास डांबरी रस्त्यावर काँक्रिटकरण केल्याचा आरोप केला आहे.

  सदर प्रसंगी उमेदवार संदीप वर्पे म्हणाले की,”
लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी विधानसभेला उमेदवाराला निवडून द्यावे लागेल.ज्यांनी निवडून आणण्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली त्यांना मतदारांनी  विजयी केले आहे.आज त्या नेत्यास त्यांनी सोडून दिले आहे.
कायम दलबदलू नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण केली आहे.तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.आपण नक्कीच विजयी होणार असा दावा केला आहे.भाजप येथील कार्यकर्त्यांची मोठी ससेहोलपट होत आहे.त्यांच्या फलकावर साधा पंतप्रधान मोदी यांचा फोटो नाही याचा जाब का विचारला जात नाही.केंद्राच्या १५०० कोटींचा हिशेब स्वतःच्या नावावर खपवता.मग त्यांचा फोटो का नाही असा कडवा सवाल केला आहे.कोल्हे गटाचा चांगुलपणा काही कामाचा नाही असे आवाहन करून हीच स्थिती असती तर यांनी तुमचे काम आ.काळे यांच्या कार्यकर्त्यांनी केले असते का असा सवाल केला आहे.तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे.पिण्याच्या पाण्याची शहरात दुरवस्था आहे.त्यासाठी आपण वहाडणे,राजेश मंटाला यांनी काम केले पण त्याचे श्रेय भलतेच घेत आहे.तालुक्याच्या विकासाची जबाबदारी शरद पवार यांनी घेतली आहे.पीक विमा शेजारच्या तालुक्यांना ३००रुपयांनी मिळाला तर कोपरगाव तालुक्याला १०० रुपयांनी मिळाला आहे.आ.प्राजक्त तनपुरे यांना आदर्श आमदार पुरस्कार मिळाला तुम्हाला का मिळाला नाही असा सवाल केला आहे.तालुक्यात बेरोजगारी मोठी वाढली आहे.
३००० कोटींचा विकास झाला तर शहराची बाजारपेठ का वढली नाही.तीन वर्षापासून नगरपरिषदेत नगरसेवक नाही.तुमचे राज्य होते तरी काय फायदा केला आहे.शेजारचे येवला, वैजापूरचा विकास झाला मग कोपरगाव शहराचा विकास का झाला नाही.

दरम्यान या सभेत संदीप वर्पे यांनी निवडनुकीच्या आदल्या रात्री ही मंडळी चॉकलेट घेऊन येतील ते घ्या.ते मतदारांचे आहे ते घ्या पण आत गेल्यावर मात्र तुतारीचे बटण दाबून विजयी करा असे आवाहन शेवटी केले आहे.

  राजेंद्र झावरे यांनी १९९५ साली आंदोलन हाती घेऊन तळे घेण्यास भाग पाडले त्याला शंकरराव कोल्हे यांनी मदत केली असा दावा केला आहे.

   सदर प्रसंगी सुहास वहाडणे,शिवाजी ठाकरे,भरत मोरे,योगेश बागुल,शब्बीर शेखआदींनी उपस्थितांनी मार्गदर्शन केले आहे.

   सदर प्रसंगी प्रास्तविक योगेश बागुल यांनी केले आहे तर सूत्रसंचलन मनोज कपोते यांनी केले आहे तर आभार शहर प्रवक्तेराहुल देशपांडे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close