आरोग्य
कोरोना हरेल..देश जिंकेल, चित्रातून केला विश्वास व्यक्त
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगांव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाचे कलाशिक्षक प्रा. अमोल निर्मळ यांनी पोस्टर रेखाटन करून कोरोना व्हायरस “कोरोना हरेल देश जिंकेल” या विषयावर जनजागृती केली आहे. निर्मळ यांनी देशाच्या कार्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर,पोलीस व आरोग्य कर्मचारी यांच्या योगदानाचे पोस्टर रेखाटन करून कोरोना जागृती केली आहे. व या लढाईत योगदान देणाऱ्या डॉक्टर.परिचारिका,पोलीस आदींचा गौरव केला आहे.निर्मळ यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोरोना विषाणूच्या धोक्याबाबत देशातील नागरिकांना जागे करण्यासाठी अनेक जण आपल्या परिने प्रयत्न करीत आहेत.मात्र तरीही नागरिक जागे होत नाही.या युद्धात उपचार करणारे डॉक्टर,परीचारिका,पोलीस,शासकीय अधिकारी आदी आपले प्राण तळहातावर घेऊन काम करीत आहेत.त्यांची जाणीव ठेऊन डॉ.सी.एम.मेहता विद्या मंदिर येथील कला शिक्षक अमोल निर्मल यांनी एक चित्र रेखाटून आपल्या पद्धतीने या योध्याचा गौरव केला आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार २३७ इतकी झाली असून १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार २९७ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.पोलीस प्रशासन व आरोग्य विभागांतील डॉक्टर,परिचारिका,आरोग्य कर्मचारी आदी जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत असताना नागरिकांना याचे भान नसल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे हि बाब अद्यापही नागरिकांना समजत नाही या नागरिकांना जागे करण्यासाठी अनेक जण आपल्या परिने प्रयत्न करीत आहेत.मात्र तरीही नागरिक जागे होत नाही.या युद्धात उपचार करणारे डॉक्टर,परीचारिका,पोलीस,शासकीय अधिकारी आदी आपले प्राण तळहातावर घेऊन काम करीत आहेत.त्यांची जाणीव ठेऊन डॉ.सी.एम.मेहता विद्या मंदिर येथील कला शिक्षक अमोल निर्मल यांनी एक चित्र रेखाटून आपल्या पद्धतीने या योध्याचा गौरव केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.