जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पणन

सोयाबीन हमी भाव,नेत्यांना निवडणूक पाहून अश्रू,खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  चालू खरीप हंगामात कोपरगाव मतदार संघात सोयाबीनचे उत्पन्न मुबलक झालेले आहे.शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य दर मिळावा यासाठी शासनाकडून हमी भाव जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे केली आहे.

   

हातात नकदी पैसा देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं.कोपरगाव सह तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक हे सोयाबीन पिक असून सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो.मात्र केंद्र सरकारने हमीभाव ४,८९२ रुपये एवढा जारी करूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीही लाभ मिळालेला नाही.

  भारत सरकारनं 2023-24 च्या खरिप हंगामात सोयाबीनला प्रती क्विंटल 4,600 रुपये इतका हमीभाव जाहीर केला होता.2024-25 मध्ये हमीभावात वाढ करुन तो 4,892 एवढा करण्यात आलाय.पण,सरकारकडून जाहीर केलेला हमीभाव (किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम.एस.पी.यालाच बोली भाषेत हमीभाव म्हटलं जातं.) परवडत नसल्याचं कोपरगाव तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत.हातात नकदी पैसा देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं.कोपरगाव सह तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक हे सोयाबीन पिक असून सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो.त्यामुळे कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात शेतकरी नव्वदच्या दशंकात बाजरी कडून सोयाबीन पिकाकडे वळले आहेत.शेतकऱ्यांना ज्यावेळी आर्थिक अडचण असेल त्यावेळी शेतकरी सहजपणे सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी आणून आपल्या आर्थिक अडचणी सोडवू शकतो.त्यामुळे सोयाबीनच्या अर्थकारणावर लाखो शेतकऱ्यांची उपजीविका चालत असते.या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळावा यासाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून २०२४-२५ मध्ये सोयाबीनच्या हमीभावात वाढ करुन तो हमीभाव ४,८९२ रुपये एवढा जारी करण्यात आला आहे.मात्र अद्याप याची खरेदी कोपरगाव सुरू झालेली नाही.याबाबत नगर जिल्ह्यासह राज्यात नाराजी आहे.कोपरगाव तालुका याला अपवाद नाही.सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत नोंदणी देखील केलेली आहे.परंतु अद्यापपर्यंत हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आलेली नाही.मात्र आगामी निवडणुक व मतांची बेरीज कमी पडते पाहून नेत्यांना शेतकऱ्यांप्रती कंठ दाटून आला आहे.नुकताच दिवाळी सण पार पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या काहीशा आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.तसेच सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना रब्बीची पिके उभी करण्यासाठी आर्थिक भांडवलाची आवश्यकता आहे.परंतु सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नव्हते त्यामुळे याबाबत आ.काळे यांनी यांनी हे प्रसिध्दी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यामुळे शेतकरी त्याकडे केवळ निवडणूक करमणूक म्हणून पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close