जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावच्या रेशन उद्योगात कोल्हे समर्थक जास्त-…आरोप

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरात जो रेशन घोटाळा होत आहे त्यात माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर असून शहर आणि तालुक्यात असलेल्या एकूण 113 पैकी 100 दुकानदार कोल्हे समर्थक असल्याचा प्रहार आज युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी केला असून रेशन वाहतूक करणारा ठेकेदार राजू होन हा त्यांचाच असून त्याचे वडील हे संजीवनी सहकारी सहकारी कारखान्याचे माजी कर्मचारी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असल्याचे ऐन निवडणुकीच्या वातावरणात एकमेकाचे हे वस्त्रहरण कुठपर्यंत चालणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. 

  

दरम्यान रेशन घोटाळ्यात त्यांनी रेशन वाहतूक राजू होन तर रेशन संघटनेचा तालुका अध्यक्ष उत्तम चरमळ हा कार्यकर्ता असून त्यांचा पंचायत समितीचा माजी सदस्य असल्याचा आरोप केला आहे.पोलिस ठाण्यात आयोजित केलेला आंदोलनात त्यांचे अनेक चेहरे रेशन संबधित असल्याचा दाखवून दिले आहे.

 

कोपरगाव गोळीबार प्रकरणातील आरोपी समवेत विवेक कोल्हे दिसत आहे.

  कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असल्याचे दिसून येत आहे.गावठी कट्टे,तलवारीचे कारखाने खडकी उपनगरात आढळून आले आहे.तर सिनेस्टाईल गुन्हेगार एकमेकावर खुलेआम गोळीबार करताना दिसत आहे.त्यावरही सत्ताधारी आणि पोलिस गंभीर होताना दिसत नाही.उलट त्यावरून वर्तमानात मोठी चिखल फेक सुरू असल्याचे दिसून येत आहे.या महिन्याच्या प्रारंभी सोमवार दि.09 सप्टेंबर व त्या पाठोपाठ 19 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरासमोर एकमेकांविरुद्ध थेट गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली होती.त्यातील एक आरोपी तनवीर रंगरेज हा गंभीर जखमी झाला होता.त्याने सामाजिक संकेतस्थळावर चलचित्र ण प्रसारित करून सत्ताधारी गटाचे आ.काळे यांचे स्वीयसहय्यक अरुण जोशी यांचे वर गंभीर आरोप केले होते.तर दुसऱ्या चलचित्रणात त्याने थेट आ.आशुतोष काळे यांचेवर हल्लाबोल केला होता.

भाजपच्या प्रचार फेरीत कोल्हे गटाचे गोळीबार प्रकरणातील विशेष (?) कार्यकर्ते दिसत आहे.

   राहता तालुक्यात शिर्डीत सन-2011 मध्ये राजकारणी आणि गुंड याचे जे साटेलोटे उघड झाले त्याची पुनरावृत्ती कोपरगाव तालुक्यात घडताना दिसत आहे.19 सप्टेंबरच्या घटनेनंतर कोपरगाव शहर आणि तालुक्यात राजकारण पेटले (?) ते थांबण्यास तयार असल्याचे दिसत नाही.वर्तमानात काळात हाच अनुभव तालुक्यातील पत्रकार आणि नारिकांना येत असून त्या बाबत आज संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विवेक कोल्हे आणि  माजी अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी जे आरोप केले त्याला काही तासात अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आ.काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन जोरदार उत्तर दिले असून कोल्हे घराण्यावर हल्लाबोल करण्यास अजिबात वेळ घालवला नाही.

    सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,शहराध्यक्ष सुनील गंगुले,उपाध्यक्ष अशोक आव्हाटे,माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,माजी गटनेते विरेंन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,रमेश गवळी,फकीर कुरेशी,महात्मा गांधी ट्रस्टचे विश्वस्त बागरेचा,नवाज कुरेशी,आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    त्यावेळी पुढे बोलताना आढाव म्हणाले की,”आमच्या नेते आ.आशुतोष काळे यांचेवर विरोधकांनी तालुक्यात जास्त कामे केल्याने जी चिखलफेक सुरू केली आहे.ती निंदनीय आहे.त्यांनी आरोप करताना गुन्हेगार हा कोणत्याच पक्षाचा व जातीचा असत नाही हे लक्षात घेणे गरजेचे होते.मात्र त्यांनी ते लक्षात न घेता आरोप केले ही बाब दुर्दैवी असून त्यांनी आधी आपले तोंड आरशात पाहिले असते तर त्यांना नक्कीच वास्तव दिसले असते मात्र ते करण्याची ते तसदी घेतांना दिसत नाही परिणामी आम्हास पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे.त्यावेळी त्यांनी ज्या आरोपीने आ.काळे यांचेवर आरोप केले त्याचे व कोल्हे गटाच्या नेत्यांचे सोबत फोटो दाखवून खळबळ उडवून दिली आहे व आरोप करणारा गुन्हेगार हा त्यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला आहे.त्यासाठी त्यांनी आणखी सहा छायाचित्रे दाखवली आहे.त्यात अनेक आरोपी व कोल्हे गटाच्या नेत्यांची छ्याचीत्रे एकत्र आढळून येत असल्याचे दाखवून दिले आहे.(पूर्वी वाळू उद्योगात कोल्हे आणि त्यांचे समर्थक दिसत असल्याचा आरोप होता)

    दरम्यान रेशन घोटाळ्यात त्यांनी रेशन संघटनेचा तालुका अध्यक्ष उत्तम चरमळ हा कार्यकर्ता त्यांचा पंचायत समितीचा माजी सदस्य असल्याचा आरोप केला आहे.पोलिस ठाण्यात आयोजित केलेला आंदोलनात त्यांचे अनेक चेहरे रेशन संबधित असल्याचा दाखवून दिले आहे.माजी आ.कोल्हे यांचेच कार्यकर्ते दोन नंबरचे व्यवसाय करत असल्याचे आरोप करून कोल्हे यांना त्यांचा आहेर सस्नेह अर्पण केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close