जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गोळीबार प्रकरण,नऊ जणांवर गुन्हा,सर्व आरोपी अटक

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात काल झालेल्या गोळीबार प्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही गटाच्या तब्बल नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील पहिल्या गुन्ह्यातील आरोपी तनवीर रंगरेज,दादा मोरे,राहता,रवी बनसोडे,अमर भोसले,लोणी,बाळू पगारे,शिंगवे,रवी बनसोडे रा.श्रीरामपूर आदींचा समावेश आहे तर दुसऱ्या गटातील आरोपी नाजिम शेख,एजाज मणियार,सांगर मंजुळ,अजहर शेख,सर्व आरोपी अटक केली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.यातील एक इनोव्हा व एक मारुती डिझायर अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत.मात्र दोन्ही गुन्ह्यात खरे कारण पुढे देण्यात आलेले नाही.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छायाचित्रात अटक आरोपी दिसत आहे.

दरम्यान यातील आठही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून पोलिसांनी त्यांना अटक करून आज कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायधिश भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता त्यांना दिनांक 24 सप्टेंबर पर्यंत 05 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.व सदर गुन्हेगारीचे मूळ हे रेशन असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे आमच्या,’न्युजसेवा पोर्टल’चा अंदाज रास्त असल्याची नागरिकांत चर्चा आहे.


   कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना सोमवार दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी व त्यानंतर काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरासमोर घडली आहे.त्यातील एक आरोपी तनवीर रंगरेज हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटात आणि छातीत दोन गोळ्या शरीरात आढळलेल्या असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आरोपींना कोपरगाव येथील न्यायालयात घेऊन जाताना कोपरगाव शहर पोलिस दिसत आहे.

दरम्यान यातील एक आरोपी तन्वीर रंगरेज याने सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या स्विय सहाय्यकाचे नाव घेऊन आरोप केला आहे.व त्याचेवर कारवाईचे आवाहन केले आहे.त्याचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे.त्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.


   दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून यातील पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी नाजिम इस्लाउद्दिन शेख (वय-26) रा.झेंडा गल्ली गांधीनगर हा असून त्याने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,”आपण आपल्या ईनोव्हा गाडीत (क्रमांक एम.एच.04 जी.झेड.5758) बसून कोपरगाव कडून छोटया पुलाकडे जात असताना 4.30 वाजता वरील आरोपींनी आपल्या गाडी त्यांची मारुती डिझायर (क्रमांक एम.एच.42 के.1461)ही आडवी घालून त्यातील आरोपी दादा मोरे याने आपल्या गावठी पिस्तुलातून आपल्या दिशेने गोळीबार करून आपल्याला व आपल्या अन्य जोडीदार आदींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे.

   दरम्यान दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी हा रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे (वय-31) रा.पिंपळवाडी तालुका राहता याने नेमकी याच्या सारखीच हकीकत सांगितली असून या गुन्ह्यात फक्त गाडी आडवी घालण्याचा क्रम उलट झाला आहे.यात त्याने प्रमुखआरोपी म्हणून नाझिम शेख असून त्याने आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे.तर अन्य आरोपी एजाज मणियार,सांगर मंजुळ,अजहर शेख आदींनी त्यास सहाय्य केले असल्याचे म्हंटले आहे.सर्व आरोपीवर आज पहाटे साडे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव येथील लोकप्रतिनिधी यांचे स्वीय सहाय्यक यांचेवर आरोप करताना तन्वीर रंगरेज दिसत आहे.

  

दरम्यान संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीने व्हिडीओत नाव घेतलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी,पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,दिनेश अहिरे,किशोर पवार,आदींनी भेट दिली आहे.
   कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 406/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 (1),126(2),352,351 (3),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान मथुरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close