जलसंपदा विभाग
तुटीच्या खोऱ्यात पाणी वळविण्यासाठी प्रयत्न करणार – …या नेत्याचे आश्वासन
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर पडलेले पाणी पूर्वेस वळविण्यासाठी आपण लक्ष घालणार असून शेतकरी संघटना व निळवंडे कालवा कृती समितीने यात न्यायिक मार्गाने सहकार्य करून हा लढा संयुक्तपणे लढू व निळवंडे धरणासह उर्ध्व गोदावरीत पाणी आणून पाण्याची तूट दूर करणार असल्याचे आश्वासन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी जवळके येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जवळके येथील शिष्यवृती परीक्षा,लोकमंथन राज्यस्तरीय परीक्षा आणि इस्त्रोत सहलीसाठी जाण्यासाठी निवड झालेली भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांसाठी विशेष कष्ट घेणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ हा पुरस्कार देऊन आणि त्या परीक्षांत विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांचा ‘गुणगौरव सोहळा’ जवळके हनुमान मंदिर सभागृहात खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे हे होते.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काळे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,कालवा समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,ज्येष्ठ उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,बाळासाहेब थोरात,दत्तात्रय थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,अण्णासाहेब भोसले,विजय थोरात,उपसरपंच सुनील थोरात,समितीचे संघटक नानासाहेब गाढवे,नरेंद्र काळे,बापूसाहेब थोरात सर,शाळा समितीचे अध्यक्ष संदीप थोरात,अशोक शिंदे,गोदरेज कंपनीचे उपव्यवस्थापक अमोल थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुताई नवनाथ शिंदे,मीनाताई विठ्ठल थोरात,योगिता गोरक्षनाथ वाकचौरे,श्रीहरी थोरात,संतोष थोरात,एकनाथ थोरात,सौर ऊर्जा प्रकल्पाचे मार्गदर्शक अधिकारी कैलास कांबळे,संभाजीनगर येथील सौर ऊर्जा कंपनीचे संचालक अजय गोर्डे,महावितरणचे अभियंता श्री.टर्ले,ग्रामसेवक सतिष दिघे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,” गोदावरी खोऱ्यात पाण्याची मोठी तूट आहे ती भरून काढण्यासाठी तीस वळण योजनेमार्फत ही तूट भरून काढणे गरजेचे आहे.त्यासाठी जवळपास नव्वद टी.एम.सी.पाणी उपलब्ध होणार आहे.त्याचा फायदा निळवंडे लाभक्षेत्रात होणे गरजेचे आहे.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे सहकार्य गरजेचे राहणार आहे.कालवा समितीने या पूर्वी निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे.त्यामुळे या लाभक्षेत्रात आज पाणी खेळू लागले आहे.हे त्यांचे निर्विवाद श्रेय आहे.त्यासाठी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी मोठी न्यायिक लढाई केली आहे.त्यामुळेच आज हे पाणी दुष्काळी भागात दिसत आहे.मात्र आज ज्यांचे कवडीचे काम नाही ते त्याचे श्रेय घेत आहे.ज्यांना निळवंडे धरणाचा नीट उल्लेख करता येत नाही त्यांनी या बढाया माराव्या या सारखा विनोद नाही.अशी माजी खा.लोखंडे यांचे नाव न घेता टीका केली आहे.व पुढे बोलताना म्हणाले की,”आपण काही दिवसापूर्वी दुष्काळी भागातील पाझर तलाव भरले त्याठिकाणी भेट दिली आहे.त्यावेळी आपल्यासोबत समितीचे पात्रकार नानासाहेब जवरे,विलास गुळवे,सौरभ शेळके,उत्तम घोरपडे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहिला असल्याचे सांगून आगामी काळात आपणाला बंदिस्त चाऱ्यांचे काम करावे लागणार असून लाभक्षेत्रात पाणी द्यावे लागणार आहे.
सदर प्रसंगी जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल संरक्षण विभागात काम करणाऱ्या गोदरेज कंपनीचे उपव्यवस्थापक अमोल बन्सी थोरात,डॉ.राजेंद्र कारभारी थोरात,विलास निवृत्ती थोरात,अभियंता संजय भिकाजी थोरात यांना,’ भूमिपुत्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सदर प्रसंगी त्यांनी जवळके येथील सभामंडपास दहा लाख रुपयांची तर जिल्हा परिषद शाळेस तीन इंटरअक्टिव्ह बोर्डची (साडे चार लाख) घोषणा केली आहे.तर यावेळी माजी सरपंच वसंत थोरात यांना त्यांच्या ग्रामपंचायत सरपंच काळातील लक्षवेधी कार्याची दखल घेऊन साई अर्पण संस्थेच्या वतीने,’समाज भूषण’ पुरस्कार खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रदान केला आहे.
सदर प्रसंगी खा.वाकचौरे यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक दत्तात्रय मैड,आदर्श शिक्षक निवृत्ती बढे,सुधाकर आंबीलवादे,रवींद्र बाळपुरी गोसावी,रुक्मिणी नारायण अंधारे,सुरेखा भास्कर उगले,कोमल उत्तम बागुल आदींना सन्मान चिन्ह,शाल,श्रीफळ,बुके देऊन गौरविण्यात आले आहे.तर इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी आयोजित सहलीसाठी अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जवळके जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीतील विद्यार्थिनी अमिता जालिंदर थोरात हीची प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे.तर याशिवाय अनन्या वाल्मीक बागल,गीता दशरथ जोरावर यांचेसह जिल्हा परिषद जवळके शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले २५ विद्यार्थी, राज्यस्तरीय लोकमंथन परीक्षेत ०७ विद्यार्थी आदींना गौरविण्यात आले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन ऍड.अजित काळे,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,सेवानिवृत्त अभियंता एस.के.थोरात,अमोल थोरात,रुपेंद्रा काळे,गंगाधर रहाणे,तानाजी शिंदे,कैलास कांबळे,अजय गोरडे,महावितरण अभियंता श्री.टर्ले आदींनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार सरपंच सारिका थोरात यांनी मानले आहे.