अपघात
दुचाकी अपघात,एक ठार,गुन्हा दाखल
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी शेतकरी इसम ज्ञानेश्वर बहिरू चौधरी (वय -63)यांचे पाढेगाव शिवारात दुचाकी अपघातात जखमी होऊन उपचार सुरू असताना नुकतेच निधन झाले आहे.याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत असे की,”मयत इसम हे शिरसगाव येथील रहिवासी होते.ते दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकी वरून (क्रमांक एम.एच.17 ए.यु.732) वरून कोपरगावकडून शिरसगाव कडे जात असताना ते पढेगाव हद्दीत आले असता माऊली मंदिराजवळ त्यांचा खड्डा चुकवताना तोल जाऊन ते खाली पडले होते.त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांच्या डोक्यास व खांद्यास मोठी दुखापत झाली होती.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना वाचिवण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपयश आले आहे.त्यात त्यांचे निधन झाले आहे.त्यांच्यावर शिरसगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.या प्रकरणी त्यांचा साईनाथ ज्ञानेश्वर चौधरी यांनी तातडीने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.308/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 106(1),281,125,(ब),324,(4),(5),मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस हे.को.निजाम शेख यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.निजाम शेख हे करीत आहेत.