जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

…या तालुक्यात शिवसेनेचा “निर्धार मेळावा”

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व शिवसैनिक,युवा सैनिक महिला आघाडी,बूथ प्रमुख,गण प्रमुख,गट प्रमुख,वार्ड प्रमुख यांची अत्यंत महत्वाची बैठक व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे सकाळी ११:३० वाजता आयोजित केली असल्याची माहिती कोपरगाव शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली आहे.

कोपरगाव अजित पवार राष्ट्रवादीने नुकतीच जनसंवाद यात्रा करून आपली तयारी दाखवून दिली असून त्या पाठोपाठ आता शिवसेना (उबाठा) गटाने आपली कंबर कसली आहे.त्यासाठी कोपरगाव शिवसेनेने आगामी निवडणुकीत आपला सावता सुभा जाहीर केला आहे.त्यामुळे आगामी काळात विधानसभेची लढत किती रंगी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी महायुतीकडून सावध पावलं टाकली जात आहेत.विधानसभेच्या २८८ जागांसाठी अवघ्या दिड -दोन महिन्यांत,अर्थात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्रातील दोन प्रमुख आघाड्या,अर्थात एकीकडे भाजपा-शिंदे गट-अजित पवार गटाची महायुती तर दुसरीकडे ठाकरे गट-शरद पवार गट-काँग्रेसची महाविकास आघाडी यांनी मित्रपक्षांसोबतच निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन आघाड्यांमधील ही थेट लढत पाहायला मिळणार आहे.त्यानुसार दोन्ही बाजूला जागावाटप,इच्छुक उमेदवार,संभाव्य उमेदवार,विजयाची शक्यता वगैरे चर्चा सुरू झाल्या आहेत.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्यास अपवाद नाही.येथेही नवीन राजकीय समीकरणे उदयास येत आहेत.कोपरगाव अजित पवार राष्ट्रवादीने नुकतीच जनसंवाद यात्रा करून आपली तयारी दाखवून दिली असून त्या पाठोपाठ आता शिवसेना (उबाठा) गटाने आपली कंबर कसली आहे.त्यासाठी कोपरगाव शिवसेनेने आगामी निवडणुकीत आपला सावता सुभा जाहीर केला आहे.त्यामुळे आगामी काळात विधानसभेची लढत किती रंगी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.त्यासाठी समीकरणे जुळविण्याचे काम सुरू आहे.त्यासाठी बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे.त्यासाठी माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी तसे प्रसिध्दी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

   त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की,” सदर बैठकी साठी खा.भाऊसाहेब वाकचौरे,जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे,जिल्हा संघटक प्रमोद लबडे,उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे,शहर प्रमुख सनी वाघ,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,योगेश बागुल,अतुल काले,उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,कालू आव्हाड,प्रफुल्ल शिंगाडे, कलविंदरसिंग दडियाल,भरत मोरे,रवी कथले,अस्लम शेख,प्रफुल्ल शिंगाडे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे,वर्षा शिंगाडे,अश्विनी होने,राखी विसपुते,सारिका कुहीरे आदी उपस्थित राहणार आहेत.
   
   सदर बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशा संदर्भात,तसेच पुढील निवडणुकांच्या संदर्भात विचार विनिमय करण्यात येणार आहे.तरी सर्व शिवसेना, युवासेना,वाहतूक सेना,महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवाजी ठाकरे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close