जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तरुणांचा राजकीय सहभाग महत्वाचा-…या मान्यवरांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

   राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची असून त्यांच्याकडे बदलाचे शिल्पकार आणि उज्ज्वल उद्याचे निर्माते होण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे अशा तरुणांना वेगवेगळ्या संधीसह सक्षम करणे,त्यांचा राजकीय,सामाजिक सहभाग वाढविणे आणि त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुणे येथील ई.एन.टी.सर्जन व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ.मिलींद भोई यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले आहे.

   

“स्व.नामदेवराव परजणे हे चालते बोलते विद्यापीठ होते.कुणाच्या धर्माच्या किंवा पंथाच्या विचाराची त्यांनी कधी प्रतारणा केली नाही.शेतकरी हाच त्यांचा खरा धर्म होता.शेतकऱ्यांना,कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अविरतपणे संघर्ष केला”-राधाकृष्ण विखे,महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य.

  गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांच्या २० व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून ‘राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग..’ या विषयावरील व्याख्यानातून डॉ.मिलींद भोई बोलत होते. कर्त्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील शिक्षणतज्ज्ञ अनिल गुंजाळ हे होते.


सदर प्रसंगी राज्याचे महसूल राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,पाटबंधारे विभागातील माजी उपअभियंता साहेबराव सैद,माजी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,रामचंद्र म्हस्के,प्रकाश चव्हाण,बालविकास प्रकल्प अधिकारी पंडितराव वाघिरे,कृषी विकास अधिकारी बाळासाहेब साबळे,कृष्णराव परजणे,श्रीमती देऊबाई परजणे,वैशाली भोई,लताताई गुंजाळ यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”युवकांच्या शक्तीचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग करुन घ्यायचा असेल तर,त्यांच्यातली उर्जा,नाविन्यपूर्ण कल्पना,अद्वितीय दृष्टीकोन याचा वापर कसा करुन घेता येईल याचा सर्वार्थाने विचार व्हावयास हवा.खरेतर तरुणाई हे राष्ट्राचे मौल्यवान साधन आहे.युवकांमधले सामर्थ्य आणि क्षमता ओळखून त्यांचा वापर योग्य पध्दतीने करुन घेतला तर राष्ट्राच्या विकासासाठी चांगला हातभार लागू शकतो असे सांगून डॉ.भोई पुढे म्हणाले.देशाचे भविष्य आणि वर्तमान युवा शक्तीच्या हातात असल्याने युवकांचा सहभाग या प्रक्रियेत अत्यंत महत्वाचा आहे.नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील विचाराला कल्पनाशक्तीची जोड दिली तर एका नव्या राष्ट्राला आकार देता येतो हा विचार आजच्या युवकांमध्ये रुजायला हवा अशीही अपेक्षा डॉ.भोई यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

  

सदर प्रसंगी कोपरगांव शहर भोई समाजाच्यावतीने डॉ.मिलींद भोई यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,भाजपाचे कार्यकर्ते विनायक गायकवाड,वसंतराव जाधव यांच्यासह भोई समाज युवा क्रांतीदलाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोरे,मानव भोई (उल्हासनगर),अनिल भोई,उत्तर नगर जिल्हा कामगार मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सतीश चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी,”स्व.नामदेवराव परजणे यांच्या सामाजिक,राजकीय वाटचालीविषयीच्या अनेक आठवणी विषद केल्या.आण्णा हे चालते बोलते विद्यापीठ होते.कुणाच्या धर्माच्या किंवा पंथाच्या विचाराची त्यांनी कधी प्रतारणा केली नाही.शेतकरी हाच त्यांचा खरा धर्म होता.शेतकऱ्यांना,कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अविरतपणे संघर्ष केला.जीवनात अनेक संकटे आलेली असतानाही त्यावर मात करुन खंबिरपणे ते उभे राहिले.अनेक संस्था उभ्या करुन त्यामाध्यमातून सामाजिक,राजकीय मूल्यांची जपणूक त्यांनी केली.अशा त्यागी पुरुषांचे कार्य आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.आजच्या चंगळवादी परिस्थितीमध्ये जुन्या पिढींच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे.आपला देश जागतिक महासत्ता बनण्याच्यादृष्टीने वेगाने वाटचाल करीत आहे.शासनाकडून केंद्रीयस्तरावर विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत.नवे तंत्रज्ञान आणि नवे विचार आत्मसात करण्यासाठी आपला युवक तत्पर असला तरी,त्यांच्या क्षमतेला प्रात्साहन देण्याची गरज आहे. यासाठी युवकांमध्ये सकारात्मक उर्जा जागृत करुन दिल्यास ते त्यांच्या ध्येयापर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतील असेही शेवटी विखे म्हणाले.

   याप्रसंगी शिक्षणतज्ज अनिल गंजाळ,शालिनी विखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.यावेळी नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या “गोदानाम संवत्सरे ” या नियतकालिकेचे प्रकाशन विखे यांच्याहस्ते करण्यात आले.तसेच संवत्सर व कोपरगांव येथील महिला महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशाचेही वितरण करण्यात आलेत.कु.ज्ञानेश्वरी मच्छिंद्र लोहकणे या विद्यार्थीनीने संस्कृतमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर दहावी परीक्षेत कोपरगांव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचाही पाहुण्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.

   प्रारंभी स्व.नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले तर शालिनी विखे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close