आरोग्य
कोपरगावात अनावश्यक गर्दी,चौघांवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील खाटीक गल्ली परिसरात अनावश्यक गर्दी केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस नाईक अर्जुन मच्छीन्द्र दारकुंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर लचुरे,रवींद्र दीपक लचुरे, व दीपाली संदीप लचुरे या तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याखेरीज कोकमठाण तीनचारी येथील आकाश शंकर दहिवाड (वय-२८)याच्या विरुद्धही पोलिसानी या कलमान्वये उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, यासाठी लोकांनी सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन वारंवार पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी करूनही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करून प्रशासनास त्रास देत असल्याने व त्यातच दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाने देशात संकट गहिरे झाल्याने देशवासीय संकटात सापडले आहे. व लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे नागरिकांनी पाळावीत.असे आवाहन वारंवार करूनही त्याला काही नाठाळ नागरिक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रशासनाची व शहराची डोकेदुखी वाढवत आहेत.
देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत ४०० ने वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील संक्रमणवाढ नसून, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांनी प्रवास केल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.देशात २६३९ रुग्ण आणि ५८ बळी आहेत. मागील २४ तासांत १५० जण बरे झाले किंवा रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले की, रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही राष्ट्रीय स्तरावरील वाढ नोंदवत नाही. मात्र, यात कुठेही काही कमी झाले तर ती संख्या वाढू शकते. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, यासाठी लोकांनी सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन वारंवार पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी करूनही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करून प्रशासनास त्रास देत असल्याने व त्यातच दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाने देशात संकट गहिरे झाल्याने देशवासीय संकटात सापडले आहे. व लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे नागरिकांनी पाळावीत.असे आवाहन वारंवार करूनही त्याला काही नाठाळ नागरिक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रशासनाची व शहराची डोकेदुखी वाढवत आहेत.
कोपरगाव शहरातील खाटीक गल्लीत याचा वारंवार प्रत्यय येत असल्याने व तेथील नागरिकांनी तक्रारी केल्याने तेथे कोपरगावचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर गेले असताना तेथे वरील तिन्ही आरोपी आढळून आल्याने व त्यांना त्याबाबत समाज देऊनही त्यांनी उलट अधिकाऱ्यांनाच अरेरावी केल्याने प्रश्न गंभीर बनला आहे. त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिसानी गु.र.नं.१२५/२०२० भा.द.वि.कलम १८८,२६९,२७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या खेरीज आकाश दहिवाड याच्याविरुद्धही सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मान गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.बी.एस.कोरेकर,आर.पी.पुंड हे करीत आहेत.