जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

राज्यकर्त्यांनी…या प्रश्नाला दुर्लक्षित केल्याने महायुतीला फटका !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   देशातील लोकसभेचे निकाल हे जात,धर्म,लिंग आदी भेदाभेदाचा कुठल्या खोट्या अस्मितेचा विचार न करता बेरोजगारी,शेत मालाचे घसरलेले भाव व कायदा सुव्यवस्था आदी महत्त्वाच्या प्रश्न विचारात घेऊन मतदान केलेले आहे.अ.नगर जिल्ह्यातील दोन्ही जागेवर सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना शेती प्रश्नावरून पराभूत होण्याची नामुष्की आली असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केले आहे.

  

  “भाजपने प्रामुख्याने दहा वर्षाच्या काळात ग्रामीण भागात शेती प्रश्नाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले असल्याचे आढळून आले होते.त्यात दूध,कांदा,कापूस,सोयाबीन,ऊस आदी कुठल्याच पिकांच्या दरात दहा वर्षाच्या सरासरी तुलनेत वाढ झालेली नाही.शेती धंदा पूर्णता तोट्यात असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.आत्महत्या व वाढतच चालल्या आहे,त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत समोर आला आहे”-अनिल औताडे,अध्यक्ष,शेतकरी संघटना.

  देशात लोकसभा निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून यात शिर्डी आणि अ.नगर लोकसभा निवडणुकीचा समावेश आहे.या निवडणुकीत भाजप-शिंदे सेना,राष्ट्रवादी अजित पवार गट आदी युतीच्या उमेद्वारांचा मोठ्या मताने पराभव झाल्याने त्याची जोरदार चर्चा देशात आणि राज्यात सुरू आहे.त्यावरून तर्कवितर्क सुरू आहे.शिर्डीत खा.सदाशिव लोखंडे यांच्यापेक्षा उद्धव सेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना उच्चांकी ०४ लाख ७६ हजार ९०० मते मिळाली असून यात त्यांचा खा.लोखंडेवर ५० हजार ५२९ मतांनी  तर दक्षिणेत सामान्य गणले गेलेले आ.निलेश लंके यांनी ०६ लाख २४ हजार ७९७ मते मिळवत सुजय विखे यांच्यावर २८ हजार ९२९ मतांनी विजय संपादन केला आहे.यावर जिल्ह्यात पराभवाच्या कारणांची मीमांसा सुरू आहे.यावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन आपले मत व्यक्त केले आहे.

अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना.

  

“शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या सहकारी साखर कारखान्यांत शेतकऱ्यांचे जोरदार आर्थिक शोषण सुरू होते.त्यावर कारवाई होण्याऐवजी सरकार त्या काँग्रेसी नेत्यांना भाजप मध्ये प्रवेश देऊन सन्मान होत होता.  सरकारकडून दहा वर्षात त्यांच्यावर कुठल्याही कारवाया झाल्या नाही.उलट त्यांना संरक्षण पुरवले गेले त्यांच्या भ्रष्टाचारास भगवा शेंदूर पावन करून घेतले गेले होते त्याचा संताप शेतकऱ्यांत होता”-युवराज जगताप,अध्यक्ष,श्रीरामपूर तालुका,शेतकरी संघटना.

   त्यात त्यांनी पुढे म्हटलं आहे की,”भाजपने प्रामुख्याने दहा वर्षाच्या काळात ग्रामीण भागात शेती प्रश्नाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले असल्याचे आढळून आले होते.त्यात दूध,कांदा,कापूस,सोयाबीन,ऊस आदी कुठल्याच पिकांच्या दरात दहा वर्षाच्या सरासरी तुलनेत वाढ झालेली नाही.शेती धंदा पूर्णता तोट्यात असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.आत्महत्या व वाढतच चालल्या असल्याचे दिसून आले होते.

    शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या सहकारी साखर कारखान्यांत त्यांच्या हिताची कामे होण्याऐवजी त्यांचे जोरदार आर्थिक शोषण सुरू होते.त्यावर कारवाई होण्याऐवजी सरकार त्या काँग्रेसी नेत्यांना भाजप मध्ये प्रवेश देऊन पावन करून घेत होते.बहुतांश नेत्यांकडून सहकारात मनमानी पद्धतीने कारभार होत होता.सरकारकडून दहा वर्षात त्यांच्यावर कुठल्याही कारवाया झाल्या नाही.उलट त्यांना संरक्षण पुरवले गेले त्यांच्या भ्रष्टाचारास भगवा शेंदूर पावन करून घेतले गेले होते.एक रुपयात पिक विमा व कर्जमाफी योजना या फक्त शेतकऱ्यांना मृगजळ ठरले होते.त्यातच महत्वाचे म्हणजे शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राधाकृष्ण विखे यांच्याकडे दुग्ध मंत्रालय आले.त्यांनी आपल्या काळात  ३५-३८ रुपये असलेले दुधाचे दर २० ते २४ रुपये आशा किमान पातळीवर आणले असल्याचे दिसून आले आहे.परिणामी दुध व्यवसाय आतबट्याचा ठरला होता.एक वर्षापासून दूध उत्पादक यांचे अक्षरशः कंबरडे मोडले होते.त्यामुळे याची झळ शहरी भागातील व्यापारी वर्गांला बसली होती.मध्यम शहरातील व्यापारी पेठा या शेतीशी निगडित असून सामान्य माणसाची क्रयशक्ती संपल्यामुळे बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या.त्याचा शहरी भागातही भाजप व मित्र पक्षांना फटका बसला आहे.

    शिर्डी मतदारसंघात खासदार लोखंडे यांच्या पाठीशी सहकारातील आ.काळे,माजी आ.कोल्हे,मंत्री विखे,मुरकुटे यांच्यासह अनेक छुपे नेते पाठीशी असल्याचे दिसून आले.परंतु वाकचौरे यांच्या पाठीशी सामान्य माणूस व सामान्य शेतकरी उभा राहिला.खा.वाकचौरेना केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे नकारात्मक मते मिळाली हे उघड सत्य आहे.त्यातच भाजप व मित्र पक्षांनी हिंदू-मुस्लिम,राम मंदिर असे नको ते मुद्दे प्रचारात आणल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.त्यामुळे राज्यकर्त्यांनी लोकसभेच्या निकालाचा बोध घेऊन पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेतकरी प्रश्नांकडे लक्ष देऊन शेतमाल भावास कायदेशीर दर्जा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय प्रस्थापितांना विधानसभेचा मार्ग मोकळा होणार नाहीं अन्यथा शेतकरी जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.

   सदर पत्रकावर श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप,राहाता तालुका अध्यक्ष योगेश मोरे,शिवाजी जवरे.रुपेंद्र काले,राहुरी तालुका अध्यक्ष नारायण टेकाळे,जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष बच्चू मोडवे,नेवासा तालुका अध्यक्ष त्रिंबक भदगले,बाबासाहेब नागवडे,अशोक नागवडे,नरेंद्र काळे,किरण लंगे,ऍड.श्री.कावळे,सागर लांडे,गंगाधर टेमक,सुदामराव औताडे,साहेबराव चोरमल,डॉ. दादासाहेब आदिक,डॉ.विकास नवले,शरद आसणे,शरद पवार,बबनराव उघडे,सतीश नाईक,गोविंद वाघ,कडू पवार,इंद्रभान चोरमल, नारायण पवार,अशोक टेकाळे आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close