जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या पोलिसांच्या हातावर तुरी ?  

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव कारागृहात गजाआड असलेला शिर्डी येथील शेजवळ खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी योगेश पारधे (वय-३०) याने कारागृहात आपल्या पोटात दुःखत असल्याचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या असल्याने खळबळ उडाली आहे.त्याचा शहर पोलीस कसून शोध घेत असून अद्याप तरी तो मिळून आलेला नाही त्यामुळे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या तणावात असल्याचे दिसून येत आहे. 

  

या पूर्वीही सन-२००७ साली कोपरगाव उपकारागृह फोडून येथील ०७ आरोपींनी पलायन केले होते.त्यावेळी पोलिसांच्या तोंडचे पाणी पळाले होते.मोठ्या प्रयत्नाने त्यांना काही महिन्यांनी जेरबंद केले होते.त्या घटनेनंतर १७ वर्षांनी ही दुसरी घटना घडली आहे.

   शिर्डीतील बहुचर्चित ‘रिंग टोन’सागर शेजवळ हत्याकांड-२०१५ या प्रकरणातील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहातून रुग्णालयात नेताना पोलीसांच्या हातावर तुरी देत फरार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री ०२  वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालय जवळ घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की,”कोपरगाव शहरातील  दुय्यम कारागृह येथे कैद असलेला सागर शेजवळ खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जेराव पारधे व विशाल कोते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.त्यांना गजाआड केलं होते.मात्र यातील पाराधे हा आरोपी कोपरगाव उपकारागृहात बंद होता.त्याने शनिवारी रात्री ०२ वाजेच्या सुमारास रक्ताची उलटी झाल्याचा बनाव केला होता.त्याला पोलीस कर्मचारी पिनू बाबुराव ढाकणे हे बळी पडले असल्याचे समजते.त्यातून त्यांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी दुचाकीवरून कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात घेऊन जात होते.दरम्यान त्यास घेऊन जात असताना त्यांची गाडीची वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत पसार झाला आहे.

   यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला.पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती दिली असून पो.हे.कॉ.ढाकणे यांच्या फिर्यादीवरून वरून आरोपी योगेश सर्जेराव पारधे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २६०/२०२४ भारतीय दंड विधान कलम-२२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने,पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची शोध पथके रवाना केली आहे.या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहे.याबाबत कोपरगाव शहर आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

  या पूर्वीही सन-२००७ साली कोपरगाव कारागृह फोडून येथील ०७ आरोपींनी पलायन केले होते.त्यावेळी पोलिसांच्या तोंडचे पाणी पळाले होते.मोठ्या प्रयत्नाने त्यांना काही महिन्यांनी जेरबंद केले होते.त्या घटनेनंतर १७ वर्षांनी ही दुसरी घटना घडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close