निवडणूक
“कांद्याच्या भावाबद्दल बोला…!,शेतकऱ्याचा खासदारास जाब,आमदाराची पंचाईत ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
शिर्डी लोकसभा मतदार संघाचा प्रचार जोरात सुरु असताना आज कोपरगाव बैल बाजारात खा.सदाशिव लोखंडे यांची आ.आशुतोष काळे यांची आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रचार फेरी सुरु असताना तेथील एका शेतकऱ्याने खा.लोखंडे यांना दहा वर्षात आता वेळ मिळाला का ? असा सवाल करून कांद्यांचे दर कुठे आहे माहिती आहे का ? अशी कान उघडणी केली असून या प्रकाराने आ.काळे यांनाही खाली पाहण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.त्यांनी या प्रकाराने संतापून खा.लोखंडे यांचेकडे रागाने पाहिले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगावसह शिर्डी लोकसभा मतदार संघात विविध तर्ककुतर्क सुरु झाले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचा प्रचार हा अंतिम चरणात प्रवेश करत आहे.त्यामुळे मतदार संघात सर्वत्र प्रचार फेऱ्या आणि गाठीभेटी,सभा,आदींना वेग आला आहे.दरम्यान सर्वच उमेदवार बाजारपेठा,आठवडे बाजार,दहावे,वर्षश्राद्ध आदींचा आश्रय घेऊन प्रचार मोहीमा राबवत असल्याचे दिसून येत आहे.यात शिवसेना उबाठा गटाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना सर्वात आधी उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात प्रथमपासून मोठी आघाडी घेतली आहे.त्यांचे सुपुत्र रोहित वाकचौरे हे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अड्.संदीप वर्पे आदींना घेऊन त्यांचीही बैल बाजारात प्रचार मोहीम सुरु होती.
दरम्यान आपल्या समर्थकांसंवेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वर्तमान खा.सदाशिव लोखंडे यांना आपल्या उमेदवारीसाठी मोठी यातायात करावी लागली आहे.त्यांना मोठ्या कष्टाने उमेदवारी मिळाली असली तरी तो विश्वास सार्थ ठरविण्याची मोठीच जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे.त्याची प्रकर्षाने जाणीव झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट शिर्डी कडे धाव घ्यावी लागली होती.त्या पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पाठोपाठ शिर्डी गाठावी लागली होती.त्यानंतर एकवढे कमी की काय भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही शिर्डी गमन करावे लागले होते.मात्र वर्तमान शिंदे गटाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी मतदार संघात कुठलाच संपर्क न ठेवल्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे.त्यांचे गावोगावी मोठे आगतस्वागत (?) होत आहे.त्यांच्या समवेत त्यांचे लाभार्थी सोडून कोणी यायला तयार नाही यातच सर्व काही आले आहे.त्यांना निवडणुकीसाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आधार घ्यावा लागत आहे.जसे राम नामाने नल आणि निल उभारत असलेल्या राम सेतूचे दगड समुद्राच्या पाण्यावर तरंगत होते तशीच अवस्था खा.लोखंडे त्यांच्यावर आली आहे.त्यांना आता कोणाचाही आधार उरलेला नाही.त्यांना गावोगाव वारंवार ठेचा खाण्याचा अनास्था प्रसंग ओढवत आहे.अशीच घटना नूकतीच सोमवार दि.०६ मे रोजी सकाळी ११ वाजता बैल बाजारात घडली आहे.त्यावेळी त्यांच्या समवेत कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांचेसह कार्यकर्त्यांचा मोठा ताफा होता.ते बैल बाजारातील शेतकऱ्यांना नमस्कार-सोपस्कार करत फिरत असताना त्यांनी एका शेतकऱ्यास हटकले असता त्यांनी आता,”आता दहा वर्षांनी वेळ भेटला का तुम्हाला यायला ? असा थेट सवाल करून कांद्याचे बाजार भाव कुठे आहे माहिती आहे का ? अशी थेट विचारणा केली आहे.एवढ्यावर शेतकरी थांबला तर नवल त्याने उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली; वरून मते मागायला निघाले”असल्याची कोपरखिळी लगावली आहे.त्यावर खा.लोखंडे यांची पाचावर धारण बसली असून त्यांना त्या ठिकाणाहून अखेर काढता पाय घ्यावा लागला आहे.त्यावेळी तेथे उपस्थित आ.काळें यांचा चेहरा पाहण्यालायक झाला होता.त्यांनाही यावर स्वतःच्या देहबोलीवर नियंत्रण ठेवता आले नाही व त्यांनी खा.लोखंडे यांचेकडे रागाने पाहिले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
त्यामुळे खा.लोखंडे यांची प्रचारा दरम्यान दिवसागणिक पंचाईत होताना दिसत आहे.येथे जावे तेथे मतदार त्यांना सापाचे तोंड ठेचावे तसे ठेचताना दिसत असून त्यामुळें त्यांच्यासमवेत प्रचाराला जावे की नाही अशी घोर चिंता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे.आगामी काळात प्रचाराचे पाच दिवस शिल्लक राहिले असताना हि नौका कशी पैलतीरास न्यावी हा मोठा यक्ष प्रश्न खा.लोखंडे आणि त्यांच्या समर्थकांना न पडला तर नवल.