आरोग्य
कोपरगाव तालुक्यात आता “५८८३”होम कोरोंटाईन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात कोपरगाव ग्रामीण रुग्णालय हद्दीत बाहेरगावातून आलेल्या नागरिकांची गत दोन दिवसात १ हजार २९६ इतकी वाढ झाली असून आता आज अखेर बाहेरून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या ५ हजार ८८३ इतकी झाली आहे.त्यात परदेशातून आलेल्या ७७ तर राज्याबाहेरून आलेल्या १३१ नागरिकांचा समावेश आहे.आकडेवारी पुढील प्रमाणे जिल्ह्याबाहेरून आलेले नागरिक ५४१५,तर तालुक्याबाहेरून आलेल्या २६० नागरिकांचा समावेश आहे.आता एकूण कोरोंटाईंनचे शिक्के मारलेले नागरिक ५८८३ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
देशात १२ तासात २४० करोनाग्रस्त वाढले आहेत, त्यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६३७ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्यान १६३७ रुग्णांपैकी १३३ जण बरे झाले आहेत अशीही माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. काल रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या १३९७ होती. मात्र मागील १२ तासात २४० ने ही संख्या वाढली आहे.देशात काल रात्रीपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या १३९७ होती. जी आता २४० ने वाढली आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
कोपरगाव नागरी भागात तालुकाबाहेरून आलेले नागरिक-४,जिल्ह्याबाहेरून-७३४,राज्याबाहेरून-२३,देशाबाहेरून आलेले-४८,एकूण कोरोंटाईन -८०९ नागरिक आहेत.कोपरगाव तालुक्यातील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका बाहेरून -७०,जिल्ह्याबाहेरून -१०४९,राज्याबाहेरून-८,देशाबाहेरून-६,एकूण शिक्के-११३३,दहिगाव बोलका-तालुक्या बाहेरून ६०,जिल्ह्याबाहेरून-८५८,राज्याबाहेरून-१३,देशाबाहेरून-३ एकूण शिक्के मारलेले नागरिक-९३४,पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीत तालुका बाहेरून-१०,जिल्हा बाहेरून -९६९,राज्याबाहेरून-७,देशाबाहेरून-२,एकूण शिक्के मारलेले नागरिक ९८८,संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका बाहेरुन आलेले नागरिक -५,जिल्हा बाहेरून-५२४,राज्याबाहेरून-१०,देशाबाहेरून-११, एकूण शिक्के मारलेले नागरिक ५५०,टाकळी-ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीत तालुका बाहेरून आलेले नागरिक -९९,जिल्हा बाहेरून-७७८, राज्याबाहेरून-५५,देशाबाहेरून-६,एकूण शिक्के मारलेले नागरिक-९३८,वारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत तालुका बाहेरून -१२,जिल्हा बाहेरून-५०३,राज्याबाहेरून-१५,देशाबाहेरून-१,एकूण शिक्के मारलेले नागिरक ५३१,असे एकूण ५ हजार ८८३ नागरिक बाहेरून आले आहे.जी संख्या चिंताजनक मानली पाहिजे व त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.अद्याप धोक्याचा कालावधी संपलेला नाही.नागरिकांना आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागणार आहे.बेफिकिरी त्यांच्या कुटुंबाला,गावाला व परिसराला पर्यायाने तालुक्याला महागात पडू शकते असा इशारा कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव शहराचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी दिला आहे.