जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात चोरी,दोन आरोपी जेरबंद

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबल चोरीच्या घटना वाढल्या असताना पोलिसांनी केलेल्या चौकशीत सागर राजेंद्र इंगळे या संशयितास तालुका पोलिसांनी अटक केली असता व त्यास पोलिसी हिसका दाखवला असता त्याने मुद्देमाल काढून देत आणखी एक सहकाऱ्यांचे नाव उघड केले असून पोलिसांनी त्यातील आरोपी मनोज शंकर गुजरे रा.बोलकी यासह दोघांना ३१ हजार ९०० रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील करंजी हद्दीत विद्युत मोटारी चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपासी पथक नियुक्त केले होते.त्यांनी कसून शोध घेतला असता त्यांना वरील एक सागर इंगळे हा आरोपी संशयास्पद आढळून आला होता.त्यांस दि.२८ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवला असता त्यांने आणखी एक आरोपी मनोज गुजरे याचे नाव सांगितले आहे.त्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


   सदरचे सविस्तर वृत्त असे की,” कोपरगाव तालुक्यात चोरट्यांनी मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांना विविध चोऱ्या करून वेठीस धरले होते.याआधी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर दौलतराव जाधव असताना त्यांनी एक टोळी पकडली होती त्यात सदर चोरटे विद्युत पंपाची तांब्यांची तार काढून कोपरगाव शहरातील एका इलेक्टरीकल दुकानात विकत होते.त्यांनी त्याचा छडा लावून चोरटे जेरबंद केले होते.त्यांनी जेऊर कुंभारी,जेऊर पाटोदा,सोनेवाडी,डाऊच खुर्द आदी परिसरात धुमाकूळ घातला होता.त्यानंतर हि दुसरी टोळी पकडली गेली होती त्यात आरोपी कृष्णा गंगाधर सानप,योगेश छगन माळी दोघे रा.बक्तरपूर आदींना १५ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक केली होती.त्यानंतर हि तिसरी टोळी पकडली गेली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपासी पथक नियुक्त केल्यावर मुद्देमालासह आरोपी दिसत आहे.

  यातील कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथील फिर्यादी शेतकरी चेतन ज्ञानेश्वर बोळीज (वय-३०) यांनी दि.२७ फेब्रुवारी रोजी सुमारे ०३ हजार २०० रुपयांचा करंजी येथील त्यांच्या शेत गट क्रं.५०४ मधील विद्युत पंप,स्टार्टर,कटआउट,केबल,दि.२३ फेब्रुवारी रोजी रात्री ०२.१० वाजता चोरी गेला असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.६१/२०२४ भा.द.वि.कलम ३७९ अणव्ये हा दाखल केला होता.त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी यासाठी तपासी पथक नियुक्त केले होते.त्यांनी कसून शोध घेतला असता त्यांना वरील एक सागर इंगळे हा आरोपी संशयास्पद आढळून आला होता.त्यांस दि.२८ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवला असता त्यांने आणखी एक आरोपी मनोज गुजरे यांच्या नावाची पोपटासारखी कबुली दिली होती.त्याचेकडून दोन विद्युत पाणबुडी मोटारीसह चार रेंजर सायकली असा एकूण ३१ हजार ९०० रुपयांचा अवैज जप्त केला आहे.


    या कामगिरी तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे,पो.हे.कॉ.निजाम शेख,संदीप बोटे,पो.कॉ.रशीद शेख,अंबादास वाघ,राजू शेख,जयदीप गवारे.अमोल फटांगरे,आदींनी महत्वाची भूमिका निभावली आहे.या कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close