निधन वार्ता
बापूराव थोरात (सर)यांना पुत्रशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील मूळ रहिवासी व रयत शिक्षण संस्थेत आपली माध्यमिक शिक्षक सेवा बजावलेले,माध्यमिक शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष बापूराव गोपाळा थोरात सर यांचे जेष्ठ पुत्र अभियंता वैभव थोरात यांचे काल सकाळी ०६ वाजता पुणे येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले आहे.त्यांच्यावर काल रात्री ८.१५ वाजता जवळके अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आले आहे.

स्व.वैभव थोरात यांनी १९९८ साली ‘यांत्रिकी अभियंता’ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते.त्यांनी प्रारंभी पुणे येथे ‘ऍडवर वेल्डिंग’ कंपनीत सेवा बजावली होती.त्यांनतर त्यांनी आपल्या सेवा बजावत ते ‘शिल्पा मशिनरी अँड टेकॅनॉलॉजि ‘या कंपनीत,’प्रकल्प अधिकारी’ या पदावर कार्यरत होते.
त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गत ३० जानेवारी रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात भरती केले होते.मात्र त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांची काल सकाळी ०६ वाजता प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात आई,वडील,दोन चुलते, पत्नी,दोन भाऊ,एक बहीण,दोन मुले,असा परिवार आहे.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.