जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

महाआघाडी सोबत जाण्याचा…या नेत्याचा निर्णय चुकीचा-मंत्री आठवले

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिवसेनेत उद्धव ठाकरे एकटेच असून त्यांच्या सोबत केवळ दहा-बारा आमदार आहे.ठाकरेच आम्हाला सोडून गेले.ठाकरे तिकडे महाघाडीत गेले आणि त्यांचे सर्व आमदार इकडे आले.२०१९ साली उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादी व कॉंग्रेस सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय चुकींचाच होता.आता ते केवळ संतापलेले असून मोदींवर टीका करत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

 

अ.नगर जिल्ह्यात येऊन केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले हे आपल्या दावा पक्का करण्याचा प्रयत्न करताना दिसत असून या ठिकाणी महाआघाडीकडून माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा दावा पक्का मानला जात असून अद्यापही महायुतीकडून उमेदवार निश्चित झालेला नाही.या वर सेनेकडून माजी आ.भाऊसाहेब कांबळे,महायुतीकडून माजी मंत्री बबनराव घोलप प्रयत्नशील असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संविधान सन्मान सोहळा व माता रमाई जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी आठवले बोलत होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले,”भारताचा विकासाचा रथ रोखण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडी उघडून सर्व विरोधक एकत्र आले आहेत.परंतु जो पर्यत आठवले केंद्रासोबत आहे तो पर्यंत हा रथ रोखंता येणार नाही.केंद्रातील एनडीए सरकार मजबूत असून सरकारला रोखण्याची ताकद कॉंग्रेसचे राहुल गांधी यांच्यात नाही.भारत जोडो ऐवजी त्यांनी कॉंग्रेस जोडो यात्रा काढावी.कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परत पक्षात आणून पक्ष पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करावा.हि भारत जोडो यांत्रा नसून फोडो यात्रा असल्याचा आरोप आठवले यांनी यावेळी केला.लोकसभा निवडणुकीत आपण सन-२००९ मध्ये शिर्डीतून मागील वेळी हरलो होतो.त्यावेळी त्यांनी,

“देशात आहे नरेंद्र मोदींची आंधी’
का मिळणार नाही मला या मतदार संघातून संधी”


अशा चारोळ्या म्हणत आठवले पुढे म्हणाले,केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाची नंबर लागेल हे सांगता येत नाही पण माझ्या सारख्या पठ्ठ्याचा नंबर नक्की लागेल.माझे नेतृत्व मोठे करण्यात कोपरगावचा मोठा वाटा असून गावागावातील कार्यकर्ते पाठीशी उभे राहून मला बळ दिले आहे.तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी आपण केंद्रात आहे.देशात दळववळणाची साधने वेगाने वाढत आहे.जनधन योजनेचे पन्नास कोटी खाते उघडण्यात आले.विना अट मुद्रा योजनेच तब्बल ४२ कोटी लोकांनी लाभ घेतला आहे.दहा कोटी पेक्षा जास्त लोकांना उज्वल गस मिळाला आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतून चार कोटी नागरिकांना घरे मिळाली,अजून तीन कोटी लोकांना घरे मिळणार आहे.८० कोटी लोकांना पुढील पाच वर्षे मोफत धन्य पुरवठा केला केला जाणार आहे.एक कोटी तरुणांचा कौशल्य विकास करण्यात आला आहे.त्यामुळे केंद्रातील एन.डी.ए.व राज्यातील महायुती सरकारला कुठलीच चिंता नाही.मल्लिका अर्जुन खर्गे हे दलित असल्याने कॉंग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला.त्यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही.नाईलाज म्हणून त्यांना पक्षाचे अध्यक्षपद दिले गेले.पंतप्रधान होऊ शकत नाही हे माहित असल्यानेच त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले जात असल्याची टीका मंत्री आठवले यांनी यावेळी केली.माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close