ग्राहक हित
ग्राहकाला उत्पादनाशी निगडित गुणवत्ता तपासण्याचा हक्क-अपर जिल्हाधिकारी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
ग्राहक हक्क या कायद्यानुसार ग्राहकाला उत्पादनाशी निगडित गुणवत्ता,प्रमाण,किंमत त्या मधील शुद्धता एक्स्पायरी डेट या सर्व बाबींची माहिती मिळविण्याचा हक्क असून त्याला आपले मत मांडण्याचा,ग्राहकाने विकत घेतलेल्या काही वस्तू मध्ये बिघाड झाले असल्यास किंवा वस्तू खराब असल्यास त्याच्या विरोधात आपले मत मांडण्याचा हक्क असून त्याबाबत तक्रार करण्याचा अधिकार असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी नुकतेच कोपरगाव येथे बोलतांना केले आहे.
कोपरगाव तहसील कार्यालयातील सभागृहात आज राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्याचे छायाचित्र.
दर वर्षी २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.भारतातील राष्ट्रपतीने २४ डिसेंबर इ.स.१९८६ रोजी या ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी दिली होती. तेव्हा पासून हा दिन साजरा केला जात आहे.या कायद्याला अस्तित्वात राहण्यासाठी बऱ्याच संस्थेने प्रयत्न केले होते.या कायद्यानुसार ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहे.देशात २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण आणि हक्क कायदा लागू झाला,त्यामुळे हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.कोपरगाव तहसील कार्यालयातील सभागृहात राज्य शासन व नागरी पुरवठा नागरी संरक्षण,जिल्हा पुरवठा विभाग आदींच्या संयुक्त विद्यमाने आज सदर ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ आज पाच दिवसांनी उशिरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी शिर्डी येथील जिल्हा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बढे,कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले,शिर्डी येथील प्रांत कार्यालय नायब तहसीलदार विकास गंबरे,कोपरगाव नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते,पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,तालुका पुरवठा अधिकारी महादेव कुंभार,भांडारपाल दिपक भिंगारदिवे,गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,भूमिअभिलेख विभागाचे तालुका प्रमुख संजय भास्कर,भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक संतोष नाईक,ज्ञानेश्वर चांडे आदींसह संगमनेर,राहाता,राहुरी,शेवगाव,श्रीगोंदा,अकोले,श्रीरामपूर,नेवासा आदी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार,बहुसंख्य नागरिक,ग्राहक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”इ.स.१९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती.तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते हे ओघाने आलेच.ग्राहक हा राजा आहे असे म्हणतानाच त्याला अनेक प्रलोभने दाखवून मालाच्या,वस्तूंच्या खपासाठी आकर्षित करुन जाळ्यात ओढले जाते.बऱ्याचदा अशा प्रलोभनांना ग्राहक बळी पडतो.एकावर एक मोफत किंवा खरेदीवर कूपन, सोडत,सोने खरेदीवर चांदीचे नाणे,फ्लॅट खरेदीवर टू व्हीलर मिळवा अशा जाहिराती केल्या जातात.त्यांना ग्राहक भुलतो.त्याची फसवणूक होते.ग्राहक दिन साजरा करण्याचा उद्देश ग्राहकाची फसवणूक होवू नये,सेवा मिळवताना हलगर्जी होऊ नये म्हणून ग्राहकाला ग्राहक कायद्याची माहिती देणे हा त्यासाठी या दिनाचे औचित्य असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बढे यांनी प्रास्तविक केले आहे.तर सूत्रसंचालन प्रफुल्लीता सातपुते यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन केंद्रीय ग्राहक पंचायतीचे सहसचिव विशाल जगदाळे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी मानले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रीय ग्राहक दिन उशिराने सुरु झाल्याने पत्रकारांची उपस्थिती कमी आढळून आली आहे.