जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

…’त्या’ पाणी बचतीबाबत कृती समितीला यश,शेतकऱ्यांत समाधान !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
   
   दुष्काळात जायकवाडी धरणासाठी पुरेसा धरण साठा नसल्याने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सुमारे ८.६४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा जो निर्णय झालेला होता त्यात आहे त्यात सुमारे ३५% नदीपात्रातील वहन व्यय गृहीत धरले असताना अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सुमारे आहेत.अंदाजे २.५ टि.एम.सी.पाण्याची बचत झाली असल्याने सदर पाऊण टि.एम.सी.पाणी धरणात ठेवावे’ हि कोपरगाव तालुका  कृती समितीने केलेली मागणी फळास आली असून जलसंपदा विभागाने त्यास हिरवा कंदील दाखवला असल्याने समितीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान याबाबत कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनीही या पाणी बचतीचा दावा केला असला तरी कोपरगाव तालुका शेतकरी समितीचे कार्यकर्ते प्रवीण शिंदे यांनी पुराव्यासह …’तो’ खोडून काढला आहे.त्यामुळे तालुक्यात या श्रेयवादाबाबत उलटसुलट चर्चा नेहमीप्रमाणे सुरु झाली आहे.

    सदरचे सविस्तर वृत्त असे की,”नाशिक शहर व परिसरात,मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दिनांक २६ नोव्हेंबर पासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस तसेच गारपीट झालेली आहे त्यामुळे या भागातील शेतकरी याच्या हाता तोंडाशी आलेले बारमाही पिके जसे की ऊस,द्राक्ष बागा,काढणीस आलेला खरिपाचा कांदा (लाल) याचे बहुतांशी नुकसान झालेले आहे.आधीच संपूर्ण पावसाळ्यात झालेला पावसाचा खंड व त्यामुळे पडलेला दुष्काळ यामुळे चिंताग्रस्त असणारा शेतकरी आता या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णतः कोलमडून पडलेला होता.दरम्यान दुष्काळात जायकवाडी धरणासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सुमारे ८.६४० अब्ज घनफूट (टी.एम.सी.) पाणी सोडण्याचा जो निर्णय झालेला आहे.त्यामध्ये सुमारे ३५ टक्के नदीपात्रातील वहन व्यय गृहीत धरला आहे.(अंदाजे २.५ टि.एम.सी.पाणी) परंतु दुर्दैवाने वरील बाबींचा विचार न करता मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दि.२६ नोव्हेंबर पासून नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.त्यावर कोपरगाव कृती समितीने राज्याच्या जलसंपदाचे सचिव,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक,कार्यकारी अभियंता नाशिक आदींना विनंती केली होती की,”दि.२६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण अ.नगर व नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे.गोदावरी,प्रवरा नदीपात्रात जायकवाडी पर्यंत संपूर्ण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झालेला असून या पावसाचे पाणी ओढे व नाले यांच्या माध्यमातून नदीपात्रामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे.त्यामुळे जायकवाडी नगर व नाशिक मधील धरणा मधून सोडण्यात येणाऱ्या ८.६४० अब्ज घनफूट पाण्याव्यतिरिक्त अतिरिक्त पाणी हे सध्या होत असणाऱ्या पावसाच्या माध्यमातून जायकवाडी धरणासाठी उपलब्ध होणार आहे.

        त्यामुळे परिस्थिती पावसामुळे नदीपात्रातील वहन व्यय होणार नसून त्याचबरोबर पावसाचे अतिरिक्त पाणी देखील उपलब्ध होत आहे.यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात येणारे पाण्यापैकी वाहन व्ययाचे सुमारे २.५ अब्ज घनफूट (टी.एम.सी.) पाणी रद्द करावे तसेच जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणाऱ्या इतर पाण्यातून देखील नुकत्याच झालेल्या पावसाचे ओढा व नाल्यामार्फत नदीपात्रात येणारे पाणी याची देखील वजावट करावी अशी मागणी केली होती.त्याला यश आले असून जलसंपदा विभागाने हिरवा कंदील दाखविल्याने कोपरगाव शेतकरी कृती समितीने समाधान व्यक्त केले आहे.

    दरम्यान या जलसंपदा विभागाच्या या निर्णयाचे समितीचे कार्यकर्ते तुषार चारुचंद्र विद्वांस,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,प्रवीण शिंदे,संतोष गंगवाल,नितीन शिंदे,अनिल गायकवाड,योगेश गंगवाल,सदाशिव रासकर,अनिल शेवते,नरेंद्र गिरमे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह राहाता,कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close