निवड
…या नेत्याची दिल्लीतील संस्थेत निवड,सर्वत्र अभिनंदन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्र सरकारच्या अखत्यारित संपूर्ण देशभरात दुग्ध व्यवसायाशी निगडीत असलेल्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एन. डी. डी. बी.) या संस्थेच्या संचालकपदी गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश नामदेवराव परजणे पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे.या संस्थेवर नियुक्त झालेले परजणे हे महाराष्ट्रातून एकमेव संचालक आहेत.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणून परजणे कार्यरत आहेत.त्यांची दि.०८ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे.दूध व्यवसाय क्षेत्रातला अभ्यास व दूध उत्पादकांसाठीच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठीची त्यांची कार्यतत्परता या गोष्टी विचारात घेऊन फेडरेशनने त्यांची पुन्हा संचालक म्हणून नियुक्ती केली असल्याचे मानले जात आहे.
राजेश परजणे यांनी भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये राबविलेल्या आहेत.श्री परजणे यांनी यापूर्वी देश पातळीवर काम करणाऱ्या कॅनरा बँकेचे संचालक म्हणूनही काम पाहिलेले आहे.अनेक सहकारी,शासकीय,निमशासकीय संस्थांबरोबरच शिक्षण संस्थांवर ते सध्या कार्यरत आहेत.
भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या संचालकपदी पुनःश्च झालेल्या निवडीबद्दल श्री परजणे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे,जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,खा.डॉ.सुजय विखे,महासंघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खंडू फेफाळे आदिंनी अभिनंदन केले आहे.