आरोग्य
सरकारची…हि योजना ठरणार गरीबांना आधार देणारी-माहिती
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरिबांसाठीची आयुष्यमान भारत योजना ५ लाखापर्यंत गरीबांना आधार देणारी योजना असल्याने त्यांचा फायदा घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महानंद व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे ग्रामपायत मार्फत व प्राथमीक आरोग्य केंद्र यांच्या विद्यमाने त्या कार्डचे वाटप महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुलोचना खेपले या होत्या.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगांव पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ.घोलप,सोमनाथ निरगुडे,लक्ष्मण साबळे,माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मण परजणे,दिलीप ढेपले,ज्ञानेश्वर कासार,बाबुराव मैंद,शिवाजी गायकवाड,शंकर नाना परजणे,नामदेव पावडे,अविनाश गायकवाड,हबीब तांबोळी बापू तिरमखे,ग्रामविकास अधिकारी कृष्णदास अहिरे,पंचायत कर्मचारी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका लाभार्थी ग्रामस्थ आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पंतप्रधान नरेन्द्र मोदींची योजना महत्वाकांक्षी व दक्षिण नगरचे खा.सुजय विखे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचे अवचित्त साधून संवत्सर येथे सुमारे ४००० हजार कार्ड वाटप केले आहे. भारतातच या योजनेचा फायदा प्रथमच सुजय विखे यांनी अंध व अपंग यांच्यासाठी जिल्हयात राबवून त्याचे फायदे गरीबा पर्यंत देणारे ते भारतातील पहिले खासदार ठरले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.पंतप्रधान मोदीकडून त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या कार्ड धारकाना या योजनांच्या आधारावर उपचार करण्यासाठी कोपरगांव येथील डॉ.जपे हॉस्पिटल डॉ.मुळे हास्पिटल आत्मा मालिक व मुळे हॉस्पिटल निवडले गेले असून संवत्सर गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक उपसरपंच विवेक परजणे यांनी केले तर आरोग्य अधिकारी आदिनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.उपस्थितांचे आभार प्राथमिक आरोग्य कर्मचारी श्री.पाखले यांनी मानले आहे.