शैक्षणिक
…या शाळेत हिंदी दीन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये १४ सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

हिंदी दिवस दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. याच दिवशी, १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदी भाषेला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या दिवसाचे महत्त्व हिंदी भाषेचा आदर करणे आणि तिचा प्रचार करणे हे आहे, ज्यामुळे ती भारताची एक महत्त्वाची राष्ट्रीय ओळख बनली आहे.त्यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम संपन्न होत आहे.सुरेगाव हद्दीत गौतम पब्लिक स्कूल मध्ये तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
यावेळी हिंदी दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेची बैठक व्यवस्था शाळेच्या भव्य प्रांगणात आपल्या भारत देशाच्या नकाशाची भव्य प्रतिकृती व हिंदी नामफलक साकारत करण्यात आली होती.
याप्रसंगी विद्यार्थ्यानी बैठक व्यवस्थेतून साकारलेली देशाच्या नकाशाची भव्य प्रतिकृती लक्षवेधी ठरली आहे.गौतम पब्लिक स्कूलने या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेप्रती अभिमान निर्माण करण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी साकारलेला मानवी नकाशा हा नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला आहे.
याप्रसंगी प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत त्यांच्या कलागुणांना उचित न्याय देण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.त्यांच्याच संकल्पनेतून आगळ्या वेगळ्या पद्धतीने राष्ट्रीय हिंदी दिन साजरा करण्यात आला आहे.
दरम्यान या उपक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आ.अशोक काळे,संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे आदींनी समाधान व्यक्त केले आहे.
या उपक्रमासाठी पर्यवेक्षिका ज्योती शेलार, कला विभाग प्रमुख गोरक्षनाथ चव्हाण,हिंदी विभाग प्रमुख कविता चव्हाण,प्रकाश भुजबळ, इसाक सय्यद,राजेंद्र आढाव,अंजुम शेख आदींनी परिश्रम घेतले होते.