सण-उत्सव
…या बचत गटामार्फत वस्तू वाटप उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील श्रीपाद माऊली महिला बचत गटामार्फत दिपावलीनिमित्त सर्व महिला सभासदांना प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सारिका विजय थोरात यांचे हस्ते बचत गटाकडून साडी व १५ लि.गोडे तेल डब्याचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
बचत गट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे.ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसाहाय्य गट असेही संबोधले जाते गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते,हे बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होय.हा नाबार्डचा सूक्ष्म वित्त पुरवठ्याचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम मानला जातो.त्यातून सदर गट आपला विकास व उद्दिष्ट गाठत असतो.असाच गट कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे श्रीपाद माउली महिला बचत गट नावाने ओळखला जात आहे.त्यांनी माहिलासाठी विविध उपक्रम राबवले आहे.त्यांनी नुकताच आपल्या सदस्यांना दिपावली निमित्त गोडे तेलाचे पंधरा लिटर डब्यांचे वाटप केले आहे.
सदर प्रसंगी प्रस्तावना बचत गटाच्या सचिव योगिता थोरात यांनी केली आहे.बचत गटाच्या अध्यक्षा पल्लवी थोरात यांनी सरपंच सारिका थोरात यांचा सत्कार केला आहे.
अध्यक्षीय भाषणात सरपंच सारिका थोरात यांनी बचत गटाच्या उपक्रमाविषयी महिला सदस्यांचे कौतुक केले व सत्काराबद्दल आभार व्यक्त केले तसेच त्यांनी दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.शेवटी बचत गटाच्या अध्यक्षा पल्लवी थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.
या उपक्रमाचे निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,जलसंपदाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बंडू थोरात,नवोदित ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कचरू थोरात,सुनील वामन थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदूबाई नवनाथ शिंदे आदींनी कौतुक केले आहे.