आरोग्य
कर्मवीर कारखाना करणार हँड सॅनिटायझरचे उत्पादन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याराज्यांत कोरोनाबाधितांसाठी विशेष रुग्णालये, कृत्रिम श्वसनयंत्रांची खरेदी तसेच रेल्वे-सैन्य दलाच्या आरोग्य यंत्रणेची मदत घेण्याची योजना आखण्यात आली आहे.या विषाणूला दूर ठेवण्यात हॅन्ड सॅनिटाईझरची महत्वाची भूमिका आहे.मात्र त्याची मागणी वाढल्याने अनेकजण त्याचा गैरफायदा घेत असल्याचे शासनाचे लक्षात आले आहे.हा तुटवडा दूर करण्यासाठी आरोग्य मंत्रांच्या कारखान्याने जालना जिल्ह्यात पहिले सॅनिटाईझरचे उत्पादन घेण्याचा पहिला निर्णय घेतला आहे.
देशात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली नसली तरीदेखील सांभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व बाबींसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्याराज्यांत कोरोनाबाधितांसाठी विशेष रुग्णालये, कृत्रिम श्वसनयंत्रांची खरेदी तसेच रेल्वे-सैन्य दलाच्या आरोग्य यंत्रणेची मदत घेण्याची योजना आखण्यात आली आहे.या विषाणूला दूर ठेवण्यात हॅन्ड सॅनिटाईझरची महत्वाची भूमिका आहे.मात्र त्याची मागणी वाढल्याने अनेकजण त्याचा गैरफायदा घेत असल्याचे शासनाचे लक्षात आले आहे.हा तुटवडा दूर करण्यासाठी आरोग्य मंत्रांच्या कारखान्याने जालना जिल्ह्यात पहिले सॅनिटाईझरचे उत्पादन घेण्याचा पहिला निर्णय घेतला आहे.त्या पावलावर पाऊल ठेऊन कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनीही या बाबत सरकारकडे परवानगी मागीतली असून त्यांना ती मिळाल्याने कारखान्याने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.
सर्व कागदपत्रांची खातरजमा करून अन्न व औषध विभागाच्या कार्यालयाचे सहआयुक्त यांनी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याला हँड सॅनिटायझरचे उत्पादन निर्मितीसाठी परवाना दिला असून अन्न व औषध विभाग कार्यालयाच्या सूचना व मार्गदर्शना नुसार लवकरच हँडसॅनिटायझरचे उत्पादन सुरु करण्यात येणार असल्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी शेवटी सांगितले आहे.