जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

शिर्डीत…या मागण्यांसाठी होणार आंदोलन ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही त्यासाठी असंबंध उदघाटने करण्यासाठी प्रतीक्षा करून साईभक्तांची अक्षम्य उपेक्षा केली जात असल्याच्या निषेधार्थ शिर्डीत श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांचेसह ग्रामस्थ आगामी दि.१५ ऑक्टोबर रोजी शिर्डीत उपोषण करणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नको त्या गोष्टींचे राजकीय श्रेय घेणाऱ्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“सन-२०१८ मध्ये तत्कालीन व्यवस्थापन मंडळाने साई भक्तांचे ऊन वारा आदी पासून संरक्षण होण्यासाठी १०९ कोटी रुपयांची दर्शन रांग बांधण्याचा निर्णय घेतला होता.सदरचे काम तीन वर्षांनी पूर्ण केले गेले होते मात्र आता पाच वर्ष उलटूनही त्याचे उदघाटन अद्याप करण्यात आलेले नाही तीच स्थिती शैक्षणिक संकुलाची असून राजकीय नेत्यांनी एक दमडी दिली नसताना त्याची उदघाटनासाठी का प्रतीक्षा केली जात आहे”-डॉ.एकनाथ गोंदकर,माजी विश्वस्त,श्री साईबाबा संस्थान शिर्डी.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”२०१९ ला राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली विधी व न्याय विभागाच्या नियमावलीनुसार शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळाची नेमणूक केली होती.या मंडळाच्या अध्यक्ष व विश्वस्तांना आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार नसले तरी साई भक्तांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात व श्री साईबाबा संस्थानचे विकासात्मक निर्णय घेण्याचे काही निर्णय घेण्याची मुभा होती.त्यामुळे या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली संस्थानचा कारभार सुरु होता व साई भक्तांना देखील सोयी-सुविधा मिळत होत्या.मात्र मागील काही महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार होवून नवीन सरकार स्थापन झाले व सप्टेंबर २०२२ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते.त्या आदेशा विरोधात विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यानंतर त्रिसदस्यीय मंडळ कार्यरत आहे.त्यात जिल्हा प्रमुख न्यायाधीश,जिल्हाधिकारी,आणि भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आदींचा समावेश आहे.त्यात त्यानीं नुकताच शिर्डी बाहेरील साई मंदिरांना निधी देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

दरम्यान शिर्डीत साईभक्तांना सेवा देण्यात अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.त्यात डॉ.एकनाथ गोंदकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,”सन-२०१८ मध्ये तत्कालीन व्यवस्थापन मंडळाने साई भक्तांचे ऊन वारा आदी पासून संरक्षण होण्यासाठी १०९ कोटी रुपयांची दर्शन रांग बांधण्याचा निर्णय घेतला होता.सदरचे काम एक वर्षात पूर्ण करणे अभिप्रेत असताना ते तीन वर्षांनी पूर्ण केले गेले होते मात्र आता पाच वर्ष उलटूनही त्याचे उदघाटन अद्याप करण्यात आलेले नाही.सरकारने त्यासाठी एक दमडीही खर्च केलेली नसताना वरिष्ठ नेत्यांची उदघाटनासाठी प्रतिक्षा का केली जात आहे ? त्याला कोण खोडा घालत आहे ? असा सवाल करत उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय मंडळ नेमलेले असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.

“साईबाबा विश्वस्त मंडळाने ठराव करून १० एकर क्षेत्रात २१८ कोटी रुपये खर्चून सर्व शैक्षणीक संकुले बांधण्याचा ठराव केला होता.त्यात ०१ हजार वर्ग बांधण्याचा निर्णय झाला होता.त्यात पोहण्याचा तलाव,ऍथेलिटीक्स खेळाचा समावेश आहे मात्र त्याचेही उदघाटन होत नाही हि खेदजनक घटना आहे”-संध्या प्रकाश शेळके,माजी नगरसेविका शिर्डी नगरपरिषद.

दरम्यान माजी नगरसेविका संध्या प्रकाश शेळके यांनी दर्शन रांग सुरु करावी यासाठी दि.२४ ऑगष्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी करूनही उपयोग झालेला नाही.साई संस्थानने पिंपळवाडी रस्ता बेकायदेशीर बंद केला होता.तो सुरु करावा म्हणून निकाल हाती आलेला असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.व त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत आहे.

दरम्यान तत्कालीन विश्वस्त मंडळाने सर्व शैक्षणिक सुविधा एकाच छताखाली याव्या म्हणून ठराव करून १० एकर क्षेत्रात २१८ कोटी रुपये खर्चून सर्व शैक्षणीक संकुले बांधण्याचा ठराव केला होता.त्यात ०१ हजार वर्ग बांधण्याचा निर्णय झाला होता.त्यात पोहण्याचा तलाव,ऍथेलिटीक्स खेळाच्या समावेशासह इमारत बांधण्याचा ठराव होता.सदर काम अठरा महिन्याची मुदत संबंधित ठेकेदारास दिली होती.त्याची मुदत संपून सव्वा वर्ष झाले आहे मात्र त्याची फर्निचरसह उचित कारवाई होत नाही याबाबत खेद व्यक्त केला आहे.व साडेचार वर्ष उलटूनही उच्च न्यायालय निर्देशित त्रिसदस्यीय विश्वस्त मंडळ त्यास परवानगी देत नाही व चालढकल करत असल्याचा आरोप केला आहे.

   वर्तमानात काही राजकीय नेते (महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता ) देशाचे पंतप्रधान आपल्या राजकीय सोईसाठी यावे यासाठी अट्टहास धरून बसले आहे.मात्र त्यास पंतप्रधान कार्यालयाने कुठलीही समर्थता दर्शवली नाही तरीही आपला बाल हट्ट धरत असून सदरची घटना हि निंदनीय असल्याने वरील तिन्ही मागण्या त्वरीत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.न केल्यास आगामी घट स्थापनेच्या दिवशी दि.१५ ऑक्टोबर २०२३ पासून साईभक्त व ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.त्यासाठी अध्यक्ष,साईबाबा संस्थान यांना निवेदन देत असल्याचे डॉ.एकनाथ गोंदकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे आता साईबाबा विश्वस्त मंडळ काय भूमिका घेणार याकडे शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त डोळे लावून बसले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close