विशेष दिन
… या ठिकाणी कर्मवीर जयंती उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल मध्ये डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते.सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.’कमवा आणि शिका’ या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले.महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना ‘कर्मवीर’ ही उपाधी देऊन सन्मानित केले.भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला होता.त्यांची जयंती कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील,’जनता इंग्लिश स्कूल’ येथें नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हे होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोमैय्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बापूसाहेब भोसले यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते व विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे.दहावीच्या विद्यार्थिनीनीं स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश मोरे यांनी केले आहे तर विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा मिळवलेल्या नैपुण्याचा गुण गौरव करण्यात आला आहे.मार्च २०२२-२३ च्या परीक्षेमध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषक देण्यात आले आहे.
सदर प्रसंगी विद्यालयाच्या घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेमधून लहान गटा मधून साई लोहरे विद्यार्थ्याचे लक्षवेधी भाषण सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले त्याचबरोबर मोठ्या गटातून ज्ञानेश्वरी उकिरडे या विद्यार्थिनीने कर्मवीर अण्णांचे शैक्षणिक कार्य सांगितले आहे.