जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

उत्तर नगर जिल्ह्यातील…या नेत्यांचा बी.आर.एस.मध्ये प्रवेश !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


राज्यातील मराठवाडा,सोलापूरनंतर ‘बी.आर.एस.’चा मोर्चा नागपूर,पुणे आणि त्या पाठोपाठ त्यांनी आपले लक्ष अ.नगरकडे वळवले असून उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव यांचेसह वारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रावसाहेब टेके यांनी भारत राष्ट्र समितीची वाट धरली असून आता कोपरगाव तालुक्यात ते प्रस्थापित आ.आशुतोष काळे-माजी आ.कोल्हे यांना कसे सामोरे जाणार याकडे तालुक्यातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.


   “आपण शिवसेनेत असताना हाती घेतलेले कामे या पक्षात राहूनही शेवटास नेणार असून त्यात कोपरगाव तालुक्याचा पाणी प्रश्न,शेती मालाचा प्रश्नासह ऊस दराचा प्रश्न,पश्चिमेचे पाणी पूर्वेस आणणे आदींसह साईबाबा कॉर्नर येथील महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या सुमारे ५३ एकर क्षेत्राचा उच्च न्यायालयात सुरु असलेल्या तंट्याचा समावेश आहे”-बाळासाहेब जाधव,नव्याने प्रवेश केलेले नेते,भारत राष्ट्र समिती,उत्तर नगर जिल्हा.

आंध्र प्रदेशातून वेगळा होऊन तेलंगण राज्याची निर्मिती करून घेण्यात; तसेच सलग दुसऱ्यांदा सत्ता ताब्यात ठेवण्यात के.चंद्रशेखर राव (केसीआर) यशस्वी ठरले आहेत.तेलंगणात शेतकऱ्यांसह विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवून,त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात के.सी.आर.यशस्वी झाले असे चित्र माध्यमांतील जाहिरातींमधून निर्माण झाले आहे.राष्ट्रीय पातळीवर धडक मारण्यासाठी तेलंगण राष्ट्र समितीला,भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या नव्या अवतारात आणून,के.सी.आर.यांनी महाराष्ट्रमार्गे देशभर जाळे विस्तारण्याचा मनसुबा जाहीर केला आहे.त्यांनी शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्थेचे मोठे काम केले आहे.त्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी त्याच्या केंद्रस्थानी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये ‘बी.आर.एस.’ पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे संकेत दिले आहे.महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे या पक्षाने आधीच जाहीर केले होते,पण या निवडणुकांबाबतची अनिश्चितता अद्याप कायम असल्यामुळे भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात आता पक्षविस्ताराचा कार्यक्रम आखला असून यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणि इतर माहिती नांदेडच्या शिबिरामध्ये पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेली आहेच.

दरम्यान या आधी त्यांनी शेतकरी संघटनेचे बडे राष्ट्रीय नेते रघुनाथ दादा पाटील,कार्यकाध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध विधीज्ञ अजित काळे यांनी राज्य पातळीवर प्रवेश करून धमका उडवून दिला आहे.

दरम्यान,;अबकी बार;किसान सरकार’ चा नारा देऊन आगामी काळात के.सी.आर.महाराष्ट्रात काय खळबळ माजवणार आहेत,हे आगामी काळच सांगेल.मध्य प्रदेशमार्गे दिल्लीत धडक देण्याची त्यांची योजना कितपत भावते,याकडेही राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.मराठवाडा,सोलापूरनंतर ‘बीआरएस’चा मोर्चा नागपूर,पुणे आणि त्या पाठोपाठ त्यांनी आपले लक्ष नगरकडे वळवले आहे; पण पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांसमोर जाणारी ही वाट त्यांच्यासाठी वाटते तितकी सोपी दिसत नाही.

भारत राष्ट्र समितीचे तेलगंणांचे मुख्यमंत्री के.सी.राव यांचा सत्कार करताना बाळासाहेब जाधव दिसत आहे.

कोपरगाव तालुक्यात प्रस्थापित आ.आशुतोष काळे व माजी आ.कोल्हे यांचे बडे प्रस्थ असून त्यांनी शेतकऱ्यांच्या  आर्थिक नाड्या विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपल्या हाती घेतलेल्या आहेत.त्यातून शेतकरी पुरता नागवला गेला आहे.त्यातच राज्यात विविध राजकीय पक्ष हा नुसता तमाशा ठरला आहे. कोण कोणत्या पक्षात आहे हे समजायला मार्ग नाही.अशातच राज्यात मोठी राजकीय पोकळी तयार झाली आहे.त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर राष्ट्र समितीला होऊ शकतो.तालुक्यातील नेत्यांनी शिव सेनेत आणि भाजपात वाटमारी केल्याने शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठी कोंडी झालेली आहे.त्यांना राष्ट्र समिती हा मोठा पर्याय ठरू शकतो असे मानले जात आहे.उत्तर नगर जिल्ह्यात प्रस्थपित राजकारणी लोकांना विविध पक्षातील कार्यकर्ते वैतागले आहेत.उत्तर नगर जिल्ह्यातील नेते तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी अशी वर्तमान स्थिती आहे.त्यामुळे याकडे आपण शेतकरी विकासाची संधी म्हणून पाहत असल्याची बाळासाहेब जाधव यांची प्रतिक्रिया बोलकी असून त्यांना हा विचार सामान्य शेतकरी आणि मतदार यांचे पर्यंत पोहचविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे हे उघड आहे.

आज जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी,’हॉटेल स्पॅन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर प्रसंगी बाळासाहेब जाधव,रावसाहेब टेके यांचे समवेत पी.डी.आहेर,लक्ष्मण वैराळ,आबुभाई मणियार,प्रकाश शिंदे,किसन सोनवणे,नवनाथ वाघ,गणेश पगारे आदींनी प्रवेश केला असल्याची माहिती भारत राष्ट्र समितीचे कोपरगाव विधानसभा समन्वयक सचिन वाबळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close