गुन्हे विषयक
रंगेहात चोरटा पकडला,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि तालुका हद्दीत चोरीच्या घटनांत वाढ झालेली असताना शहर पोलिसांना एक मोबाईल चोर आरोपीस रंगेहात पकडण्यास यश आले असून त्यांनी एक निफाड तालुक्यातील कुंदड येथील आरोपी शाहबाज इस्माईल शेख (वय-२२) यास पकडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.त्यामुळे शहरात पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा उपद्रव अद्याप कमी होण्याचे नाव घेताना दिसत नसून काही दिवसापूर्वी
वडांगळे वस्ती येथील चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची शाई वाळते न वाळते तोच कोपरगाव येथील साखरे स्टील यांची ५० हजारांची चोरी झाली असून त्याच रस्त्यालगत योगीराज फर्निचर,संस्कृती साडी डेपो आदिसंह सात दुकाने फोडली होती त्यानंतर मागील सप्ताहात डॉ.जगदीश झंवर यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची साखळी चोरट्यांनीं तोडून नेण्याचा प्रयत्न केला होता त्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीची दिड तोळा वजनाची सोनसाखळी घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरले असताना दि.१२ सप्टेंबरच्या रात्री धामोरी येथील रहिवासी व खाजगी नोकरी करणारे गृहस्थ खंडू मांजरे हे आपल्या बजाज प्लॅटिना दुचाकीसह आरोपीनी सुमारे ४३ हजारांचा ऐवज लंपास केला होता.अशातच एक समाधान देणारी घटना समोर आली असून त्यात राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस स्थानकात दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास एक मोबाईल चोर आरोपी पोलिसानी जेरबंद केला आहे.
त्याचेकडून शहर पोलिसांनी १० हजार रुपये किंमतीचा निळ्या रंगाचा विव्हो कंपनीचा वाय-१५ या मॉडेलचा मोबाईल फोन त्यास पासवर्ड असलेला व तो खोलत नसलेला,दुसरा ०८ हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा ए-२० या मॉडेलचा मोबाईल फोन त्याचा पासवर्ड असलेला मात्र खोलात नसलेला असा एकूण १८ हजार रुपयांचा ऐवज आरोपीसह जप्त केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४४०/२०२३ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.अर्जुन दारकुंडे हे करत आहेत.