जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

मराठा आरक्षण आंदोलन,कोपरगावात नेत्यांची मांदियाळी,पर्याय दृष्टीपथात दिसेना !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यासह कोपरगाव येथे देखील मराठा समाजाच्या वतीने,’आमरण उपोषण’ सुरु असताना आज सकाळी खा.सदाशिव लोखंडे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी या सर्व आंदोलनांची तातडीने दखल घेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू व अधिकाऱ्यांकडून तसे लेखी देऊ असे म्हणत आज आंदोलनकर्ते अड्. योगेश खालकर,अनिल गायकवाड,विनय भगत आदिनीं भेट घेऊन सहानुभूती दाखवली असली त्यात ठोस आश्वासन दिसून आले नाही त्यामुळे या नेत्यांची भेट हि,”बोलाचा भात आणि बोलाची कढी” ठरली असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान केंद्राने भारतीय राज्य घटनेची दुरुस्ती करून सूची ९ मध्ये आरक्षण टाकून तामिळनाडू राज्याप्रमाणे आरक्षण मर्यादा ६९ टक्क्यांपर्यंत वाढवावी व राज्यातील मराठा समाजाला दिली जाणारी सापत्नपणाची वागणूक तात्काळ थांबवावी” या मागणी बाबत कोणीही कैवारी नेता बोलण्याच्या स्थितीत दिसत नाही अशी धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.

जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुटले असताना कोपरगावात मराठा समाजाच्या वतीने अड्.योगेश खालकर,अनिल गायकवाड,विनय भगत आदीं कार्यकर्त्यानी,’आमरण उपोषण’ सुरु केले असून त्याचा आज पाचवा दिवस असताना त्या आंदोलनाला पाठींबा वाढत असताना दिसून आला असला तरी आंदोलन कर्त्यांनी प्रकृती खालावली असल्याचे निष्पन्न झाले आहे.अशातच कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी दोन दिवसापूर्वी केली होती.


दरम्यान आज या आंदोलनस्थळी शिर्डीचे लोकसभा मतदार संघाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट दिली असून अड्.खालकर यांच्या मागण्यांबाबत आपण केंद्र सरकारमधील आपल्या सहकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू असे आश्वासन दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान आज या आंदोलनस्थळी शिर्डीचे लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे,माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,संजीवनींचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,अध्यक्ष विवेक कोल्हे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर,अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर,प्रांताधिकारी माणिक आहेर,तहसीलदार संदीपकुमार भोसले,सामाजिक संघटना,ग्रामपंचायती,विविध राजकीय पक्ष,मंडळे,कार्यकर्ते आदींनी पाठींबा दर्शवला आहे.

दरम्यान या आंदोलनात केंद्राची महत्वाची भूमिका असून त्या साठी केंद्रात प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.मात्र त्यासाठी आश्वासना पलीकडे काहीही प्राप्त झालेले नाही.मात्र अधिकाऱ्यांनी अड्.खालकर व त्याच्या सहकऱ्यांची भूमिका समजावून घेतली असून या बाबत जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधला असल्याचे बोलले जात आहे.मात्र तामिळनाडूतील आरक्षणाच्या कायदेशिर मागणी बाबत अधिकारी अनभिज्ञ असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यांनी याबाबत आंदोलनकर्त्यांशी याबाबत चर्चा करून त्याबाबत निवेदन मागितले असल्याची माहिती हाती आली आहे.

तथापि सर्व घटनेच्या तरतुदीप्रमाणे आरक्षण मागणी असल्याची मान्यता सर्वांनी दिली असली तरी यात थेट लेखी जबाबदारी घेऊन कोणीही प्रश्न सोडायला तयार असल्याचे दिसून आले नाही.”बोलाचा भात आणि बोलाची कढी” आढळून असल्याची प्रतिक्रिया समाजात उमटली आहे.

ऍड.योगेश खालकर यांनी “केंद्राने भारतीय राज्य घटनेची दुरुस्ती करून सूची ९ मध्ये आरक्षण टाकून तामिळनाडू राज्याप्रमाणे आरक्षण मर्यादा ६९ टक्क्यांपर्यंत वाढवावी व राज्यातील मराठा समाजाला दिली जाणारी सापत्नपणाची वागणूक तात्काळ थांबवावी” या मागणी बाबत कोणीही बोलण्याच्या स्थितीत दिसत नसल्याचे उघड झाले आहे.

मात्र त्यांनी आपल्या विविध मागण्यांचा मसुदा व निवेदन संबंधित नेते आणि अधिकारी यांना बनवून दिला असून त्याचा पाठपुरावा करण्याबाबत लक्ष वेधले आहे.आता याबाबत आंदोलनकर्ते उपोषण सोडणार की चालू ठेवणार याकडे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close