खगोल शास्त्र
विद्यार्थ्यांनी ‘विक्रम’ लँडर चंद्रयानाचे चित्र रेखाटून शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
बुधवार (दि.२३) रोजी आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांच्या कष्टातून व त्यागातून चंद्रावर पाठविलेले ‘विक्रम’ लँडर चंद्रयान २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाले त्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला झाला.देशात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येवून देशाच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यात आले.हा आनंद कोपरगाव तालुक्यातील गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील साजरा करून एकाच वेळी १२०० विद्यार्थ्यांनी ‘विक्रम’ लँडर चंद्रयानाचे चित्र रेखाटून देशाच्या शास्त्रज्ञांचे अभिनव पद्धतीने अभिनंदन केले आहे.
“आगामी काळात गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी देखील इस्रो,नासासारख्या अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये आपलं नाव झळकवतील व भारताचे नाव उज्वल करतील”-नूर शेख,प्राचार्य गौतम पब्लिक स्कूल,गौतमनगर.
भारताचं चांद्रयान ३ आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँड झालं.इस्त्रोच्या वैज्ञानिकांसह देशातील कोट्यवधी नागरिकांचं लक्ष याकडे लागलं होतं.कोट्यवधी भारतीयांच्या साक्षीनं हे इस्त्रोचं चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.विक्रम लँडर चंद्रावर सुरक्षितपणे लँड झाला आणि देशभर व जगभरच्या भारतीयांनी हा जल्लोष साजरा केला आहे.विक्रम लँडरनं चंद्रावर पोहोचताच पहिला संदेश आणि काही फोटो पाठवले आहेत.त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.कोपरगाव तालुक्यातील गौतम पब्लिक मीडियम स्कूल मध्येही हा उत्सव साजरा करण्यात आला आहे.त्यासाठी त्यांनी अभिनव पद्धत राबवली आहे.
यामध्ये गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी देखील मागे राहिले नाहीत.संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या संकल्पनेतून गौतम पब्लिक स्कूलच्या १२०० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ‘विक्रम’ लँडर चंद्रयानाचे या सर्व विद्यार्थ्यांनी चंद्रयान ३ चे प्रक्षेपण करण्यापासून ते चंद्रावर उतरण्या पर्यंतचे चित्रे रेखाटून या वैज्ञानिकांचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.
आगामी काळात गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी देखील इस्रो,नासासारख्या अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये आपलं नाव झळकवतील व भारताचे नाव उज्वल करतील” अशी आशा प्राचार्य नूर शेख यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व बालकलाकारांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,ट्रस्टी आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,प्राचार्य नूर शेख व सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन केले आहे.