विशेष दिन
विज्ञान दृष्टीकोन ठेवून,विवेकाने जीवन जगावे-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अज्ञान अंधश्रद्धा न जोपासता प्रगत विज्ञान दृष्टीकोन ठेवून व विवेक वादाने जीवन जगावे असे विचार स्वातंत्र्य सैनिक गंगाधर गवारे मामा फौंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पगारे यांनी एका कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.त्यामुळे त्यांची देशभर ओळख निर्माण झाली होती.दहा वर्षांपूर्वी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची सकाळच्या प्रहरी हत्या केली होती.त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला होता.त्यांचे स्मरण कोपरगावात करण्यात आले आहे.
स्व.नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा,अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकप्रबोधन केले होते.महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे,यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते.यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते.समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.त्यामुळे त्यांची देशभर ओळख निर्माण झाली होती.दहा वर्षांपूर्वी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची सकाळच्या प्रहरी हत्या केली होती.त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला होता.त्यांचे खुनी अद्याप सापडलेले नाही.त्यांच्या स्मुर्तीला अभिवादन करण्यासाठी कोपरगावसह राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते.
कोपरगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कै.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ स्मृतीला अभिवादन करण्यात आले आहे.दहाव्या पुण्यतिथी निमित्त स्व.स्वातंत्र्य सैनिक गंगाधर गवारे मामा फौंडेशनच्या वतीने कै.नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व श्रद्धांजली अर्पण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नारायण डुकरे,बाबुराव जाधव,विठ्ठल मैंदड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विठ्ठल मैंदड,नारायण डुकरे,मुकबधीर विद्यालयाचे श्री गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुस्तक प्रकाशन व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील साहित्यिक,वाचनालयाचे वाचक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्रास्तविक नारायण डुकरे यांनी केले तर सूत्रसंचालन हेमचंद्र भवर यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार श्री राजगुरू यांनी मानले आहे.