जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

निष्ठावंत शिवसैनिक हिच पक्षप्रमुखांची खरी ताकद-संपर्कप्रमुख

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आज संपूर्ण देशातील यंत्रणेचा वापर महाराष्ट्रातील राजकारणाला बिहार करण्यासाठी वापरला जात असून पक्षप्रमुख उद्धव व शिवसेना पक्षापुढे अडचणी उभ्या करून पक्ष संपवण्याचे काम सुरू आहे.मात्र कितीही आव्हाने संकटे उभे केले तरी महाराष्ट्रातील प्रामाणिक शिवसैनिक ढाल बनून पक्षप्रमुखांसमोर उभा असून शिवसैनिक हीच पक्षप्रमुखांची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव गटाचे संपर्कप्रमुख उदय दळवी यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“सन-२०१४ पासून भाजपाने अंतर्गत कूटनीती वापरून शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी अनेक कारस्थाने केली.मात्र सामान्य जनतेच्या जोरावर शिवसैनिकांच्या कष्टावर शिवसेना आजही ताकदीने उभी राहिली आहे.कोपरगावात फक्त राजकारणात श्रेय मिळवण्यासाठी पोस्टर युद्ध सुरू आहे.पन्नास वर्षापासून रखडलेले पाणी प्रश्न,बाजारपेठ,बेरोजगारी,सामान्य जनतेच्या प्रश्न प्रलंबित आहे”-प्रमोद लबडे,अध्यक्ष,उद्धव गट शिवसेना.

कोपरगाव तालुका शिवसेना पदाधिकारी व शाखा प्रमुखांचा मेळावा नुकताच कोपरगाव शहातील सुवर्णकार मंगल कार्यालयात आयूजीत केला होता त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी सेना उद्धव गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,शहर प्रमुख सनीं वाघ,उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,जिल्हा संघटक सपना मोरे,भैया तिवारी,उपतालुका प्रमुख रंगनाथ गव्हाणे,गिरीधर पवार,प्रवीण शिंदे,राहुल होन,मुन्ना मंसुरी,उल्हास आवारे,धर्मा जावळे,विजय ताजणे,चंद्रकांत भिंगारे,शिवाजी रोहमारे,कृष्णा अहिरे,बालाजी गोरडे,राजेंद्र नाजगड,किरण राहणे,भाऊ पाटील थोरात,नवनाथ खालकर,गोरख वाकचौरे,सुनील गाढे,लक्ष्मण पुरी,सुनील माकोणे,अतुल सवंत्सकर,महमद पटेल,किसन भवर,नवनाथ आहेर,स्वप्नील टेके,अण्णा कोल्हे,पप्पू कोल्हे,रवींद्र देवकर,रामदास मलिक,सचिन आसणे,दत्ता वलटे,बळीराम गव्हाणे,अशोक मुरडणार आदी उपस्थित होते.

दरम्यान कोपरगाव दक्षिण भागाकरिता शैलेश खालकर यांची उपतालुका प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.त्यांच्या निवडीचे कोपरगाव तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर प्रसंगी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे हे बोलताना म्हणाले की,”सन-२०१४ पासून भाजपाने अंतर्गत कूटनीती वापरून शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी अनेक कारस्थाने केली.मात्र सामान्य जनतेच्या जोरावर शिवसैनिकांच्या कष्टावर शिवसेना आजही ताकदीने उभी राहिली आहे.कोपरगावातील वर्तमान राजकारणावर ब बोलतांना ते म्हणाले की,”कोपरगावात फक्त राजकारणात श्रेय मिळवण्यासाठी पोस्टर युद्ध सुरू आहे.पन्नास वर्षापासून रखडलेले पाणी प्रश्न,बाजारपेठ,बेरोजगारी,सामान्य जनतेच्या प्रश्न प्रलंबित असून शिवसेनेची प्रत्येक शाखा तळागाळापर्यंत जाऊन सामान्य जनतेसाठी काम करील असा आशावाद शेवटी व्यक्त केला आहे.

दरम्यान सदर प्रसंगी आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना सोडून गेलेले मात्र आज परत उद्धव ठाकरे सेनेत येऊ इच्छिणाऱ्या माजी लोकप्रतिनिधींना उमेदवारी देण्यावरून काही वर्तमान पदाधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केल्याची व मोठा गदारोळ केल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सदर प्रसंगी उद्धव सेनेचे शहर प्रमुख सनी वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आहे.त्यावेळी कोपरगाव दक्षिण भागाकरिता शैलेश खालकर यांचे उपतालुका प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले तर सूत्रसंचालन गिरीधर पवार यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार संजय दंडवते यांनी मांनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close