जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

….महसुल विभागातील मोठे मासे केंव्हा गळाला लागणार ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगावचे तत्कालीन तहसीलदार विजय बोरुडे यांनी आपल्या हस्तकांमार्फत २० हजारांची लाच घेताना नाशिक येथील अटक केली होती.त्यांच्या वरील कारवाई सुमारे दीड महिना प्रलंबित असताना तेथे कार्यरत असलेला द्वारपाल असलेला कनिष्ठ कर्मचाऱ्याची जिल्ह्याच्या ठिकाणी बदली करण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे तहसील मधील आर्थिक गैरव्यवहार कमी होण्यास मदत होणार असल्याचे समजले जात आहे.

अवैध वाळूचोर नुसते नगर जिल्ह्यात कार्यरत नाही तर नाशिक जिल्ह्यातही कार्यरत असून यातील एका संशयिताने आता पर्यंत महसुली अधिकारी आणि कर्मचारी आदींनी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकविण्यात डझनावारी ओलांडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यात राजकीय आशीर्वाद देणारे राजकीय नेते की,लाच घेणारे महसूल अधिकारी,पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणारे नदी काठचे ग्रामस्थ,कोण दोषी आहे ?

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी (वय-३३) यांनी आपले वाळूचोरीत पकडलेल्या वाहनावर कारवाई न होण्यासाठी तहसीलदार विजय बोरुडे याने आपल्या गुरमितसिंग दडीयाल या हस्तकांमार्फत शुक्रवार दि.१९ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तहसील परिसरात असलेल्या एका हॉटेल मध्ये २० हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यावर नाराज होऊन फिर्यादीने हा सापळा लावला होता.त्यातून कोपरगावचा तहसीलदार विजय बोरुडे (वय-४४) हा आपल्या हस्तकांमार्फत सुमारे २० हजारांचा हप्ता पंचासमक्ष घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप्पधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या पथकाकडून पडकले गेले आहे.त्यांना सहकार्य करणारा इसम दडियाल याचा त्यात समावेश असल्याचे उघड झाले होते.मात्र या कारवाईत अटक झालेला अधिकारी आणि त्याचा हस्तक एवढ्यावर हे प्रकरण थांबलेले नाही त्यात आणखी काही लोक सामील असल्याची माहिती हाती आली आहे.त्यात आणखी एक मंडलाधिकारी,तलाठी,एक तहसील येथील द्वारपाल,कोतवाल,आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत इसम आदी सामील असल्याची धक्कादायक माहिती हाती आली होती.विशेष म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यात व त्यांच्या नाकाखाली असलेल्या कोपरगाव तालुक्यात हे प्रकार राजरोस घडत आहे.त्यामुळे वर्तमानात लाचखोर अधिकारी अडकले जात असताना मुजोर वाळूचोरांना कोण आवरणार ? असा सवाल निर्माण झाला होता.या वाळूचोरांचे मोठमोठे इमले तयार होत असून त्यातील काही हद्दपार होऊनही पुन्हा महसुली अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुटून पुन्हा या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुंतविण्यात मग्न झाले असल्याचे दिसत आहे.ते नुसते नगर जिल्ह्यात कार्यरत नाही तर नाशिक जिल्ह्यातही कार्यरत असून यातील एका संशयिताने आता पर्यंत महसुली अधिकारी आणि कर्मचारी आदींनी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकविण्यात डझनावारी ओलांडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यात राजकीय आशीर्वाद देणारे राजकीय नेते की,लाच घेणारे महसूल अधिकारी,पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणारे नदी काठचे ग्रामस्थ,कोण दोषी आहे ? असा सवाल निर्माण झाला आहे.यातून वाळूचे भस्मासुर निर्माण होत असून गोदावरी नदीचा परिसर व शेतीक्षेत्र उजाड बनणार आहे हे मात्र नक्की.यावर राजकीय धुरीण,पर्यावरण प्रेमी नागरिक आणि समाजाला विचार करावा लागणार आहे.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे तालुक्याच्या शेजारी हाकेच्या अंतरावर आहेत.मात्र कोपरगाव तालुक्यातील तहसीलदार बोरुडे हे एका सरकारी रुग्णालयात कार्मचारी असलेल्या महिलेचा विनयभंग करतात.त्यावर त्यांचेवर कारवाई होणे तर दूर मात्र त्या महिलेवर सदर गुन्हा मागे घेण्यासाठी मोठा दवाब आणला जातो.त्या विभागातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर बदली करण्याची धमकी दिली जाते.या बाबी मोगलाईला लाजवतील अशा घडत असताना त्याबाबत महसूल मंत्री व तालुक्यातील राजकीय नेते चकार शब्द काढत नाही याला काय म्हणावे ?

नुकत्याच नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत त्यातील १३ कुप्रसिद्ध वाळूचोरांविरुद्ध कारवाई झाली असल्याची माहिती असून त्यात ४२ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे हि समाधानाची बाब मानवी लागेल.मात्र त्यातील बरेच आरोपी अद्याप फरार आहे.त्यामुळे त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान कोपरगाव तालुका पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

दरम्यान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कोपरगाव तालुक्यात वारंवार येणे होत आहे.मात्र त्यांच्या तालुक्याच्या शेजारी हाकेच्या अंतरावर असलेल्या कोपरगाव तालुक्यातील तहसीलदार बोरुडे हे एका सरकारी रुग्णालयात कार्मचारी असलेल्या महिलेचा विनयभंग करतात.त्यावर त्यांचेवर कारवाई होणे तर दूर मात्र त्या महिलेवर सदर गुन्हा मागे घेण्यासाठी मोठा दवाब आणला जातो.त्या विभागातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर बदली करण्याची धमकी दिली जाते.या बाबी मोगलाईला लाजवतील अशा घडत असताना त्याबाबत महसूल मंत्री व तालुक्यातील राजकीय नेते चकार शब्द काढत नाही याला काय म्हणावे ? त्या नंतर आगामी काळात दि.१९ मे रोजी तोच अधिकारी लाचलुचपत विभागाकडून २० हजारांची लाच घेताना पकडला जातो.तरीही अद्याप महसूल मंत्री,’मौनीबाबा’ बनले आहे.कदाचित त्यांच्या पक्षाचे तालुक्यातील नेते वाळू लिलावात सामील असल्याने त्याचे परिणाम तर होत नाहीं ना असा रास्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शेजारी संगमनेर तालुक्यात अवैध गौण खनिज उपसा केल्या प्रकरणी मोठी कारवाई होत असताना शेजारी कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव परिसरात इनामी व वर्ग-२ च्या आदिवासींना भीती दाखवून व त्यांना अल्पसा मोबदला देऊन त्यांच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उपसा केला जात आहे.यात एक कनिष्ठ महसुली कर्मचाऱ्यांचे ०५ डंपर व ०५ ट्रॅक्टर रात्रंदिन सुरू आहे.त्यात त्या भागातील मंडलाधिकारी,तलाठी हे आपले हात ओले करत आहे.मात्र हा मोठा प्रमाणावर होणारा गौण खनिज उपसा एकटे तलाठी व मंडलाधिकारी करू शकत नाही.त्यात मोठे मासे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यावर महसूल विभाग कोणती कारवाई करणार आहे ?

संगमनेर तालुक्यातील अवैध गौण खनिज काढणाऱ्यावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे.त्यात सुमारे ७००-८०० कोटींचा दंड ठोठावला आहे.त्यात अनेकांना आपले होते नव्हते गमवावे लागले आहे.कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव परिसरात इनामी व वर्ग-२ च्या आदिवासींच्या जमिनीमधून त्यांच्या जमिनी सरकार जमा करून घेणार आहे अशी भीती दाखवून व त्यांना अल्पसा मोबदला देऊन त्यांच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उपसा केला जात आहे.त्यात एक कनिष्ठ महसुली कर्मचारी ०५डंपर व ०५ ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्रंदिन गौण खनिज उपसा करत आहे. त्या भागातील मंडलाधिकारी हे आपले हात ओले करत आहे.मात्र हा मोठा प्रमाणावर होणारा गौण खनिज उपसा एकटे तलाठी व मंडलाधिकारी करू शकत नाही.त्यात मोठे मासे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यावर महसूल विभाग कोणती कारवाई करणार आहे ? तालुक्यातील सत्ताधारी राजकीय नेत्यांनी सोयीस्कररित्या आपल्या डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे.या गौण खनिजातून त्यांनी आपल्या संस्थांचे कोट कल्याण साधल्याच्या बातम्या समाज माध्यमावर फिरत आहेत.

एका माहितीनुसार पुरवठा विभागात दलालच टेबल खुर्ची टाकून बसलेले दिसतात.त्यामुळे तेथे बसलेले कर्मचारी कोणते आणि दलाल कोणते याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.दलाल कोरे रेशनकार्ड संबंधित अधिकाऱ्याकडून विकत घेऊन नवीन तयार करून देत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

काल कोपरगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून आपली पाच वर्षांची कारकीर्द यशस्वी केल्याच्या निमित्त माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी ‘कर्तव्य’ या पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी याबाबत बोलणे सविस्तर टाळले आहे.याला काय म्हणणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत आहे.तहसील मधील कागदपत्रे थेट बाहेर दलालांच्या ताब्यात जात आहेत.एवढेच नव्हे तर मागील जबाबदार अधिकाऱ्यांच्या काळात तर सहीचे अधिकार थेट बाहेरील सेतू केंद्र चालकांकडे गेले होते हि साधारण बाब नाही.त्यातून सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होऊन भ्रष्टाचाऱ्यांचे व त्यांच्या समर्थक पित्यांचे कोट कल्याण केले होते.आता कारवाई सुरु झालीच आहे तर उर्वरित एक मंडलाधिकारी,तलाठी,एक तहसील येथील द्वारपाल,कोतवाल,आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले मोठे मासे केंव्हा गळाला लागणार व त्यांच्यावर महसूल विभाग काय कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे.याकडे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close