हवामान विभाग
आता प्रत्येक गावात प्रत्येक स्वयंचलीत हवामान केंद्र !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी स्वयंचलीत हवामान केंद्र मंजूर झाले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.त्याबाबत ग्रामस्थ,शेतकरी आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२५ चा अर्थसंकल्प मांडतांना ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला होता.त्या निर्णयाची अंमलबजावणी केद्र व राज्य शासन संयुक्तपणे करणार असून त्यासाठी केंद्र शासनाच्या डब्ल्यूआयएनडीएस प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्या बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पूर्वी,स्वयंचलित हवामान केंद्रे बहुतेकदा अशा ठिकाणी ठेवली जात असत जिथे वीज आणि दळणवळणाच्या तारा उपलब्ध होत्या. आजकाल,सौर पॅनेल,पवन टर्बाइन आणि मोबाईल फोन तंत्रज्ञानामुळे वायरलेस स्टेशन्स असणे शक्य झाले आहे जे इलेक्ट्रिकल ग्रिड किंवा हार्डलाइन टेलिकम्युनिकेशन नेटवर्कशी जोडलेले नाहीत.
स्वयंचलित हवामान केंद्राचा एक मुख्य फायदा म्हणजे ते दुर्गम,दुर्गम किंवा धोकादायक ठिकाणी अचूक आणि विश्वासार्ह हवामान डेटा प्रदान करू शकते.गंभीर हवामान घटनांच्या बाबतीत अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी AWS प्रोग्राम केले जाऊ शकते.परिणामी वादळ,वारे,पूर,अतिरिक्त पर्जन्य या पासून नागरिकांचे जीवित हानी,पशुधन,पिकांचे संरक्षण करणे सोयीचे जाते.त्यामुळे त्याचे महत्व अनन्य साधारण आहे.मात्र पूर्वी एक मंडळात एक पर्जन्य मापक असल्याने बऱ्याच वेळा यात असंतुलन होऊन अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात तांत्रिक अडचणी येत असत.या बाबत अनेक बैठकांत जनमंगल ग्रामविकास संस्थेचे पदाधिकारी,शेतकरी नागरिक स्वयंचलित पर्जन्यमापकाची मागणी आमदार काळे यांचेकडे करत होते.त्याची दखल घेऊन सदर मागणी आ.काळे यांनी सरकारकडे लावून धरली होती.त्याला यश आले असून तालुक्यातील प्रत्येक गावात आता स्वयंचलित पर्जन्यमापकाची मागणी पूर्ण होणार आहे.परिणामी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे सुलभ ठरणार आहे.या बाबत ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.